Ravindra Chavan News: भाजप आमदार रवींद्र चव्हाण हे सध्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. जर, देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले नाहीत, तर रवींद्र चव्हाण यांचं नाव पुढे करु शकतात, अशी शक्यता आहे.
देवेंद्र फडणवीस यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी पक्के आहेच, पण जर काही वेगळा विचार झाला तर देवेंद्र फडणवीसांकडून रवींद्र चव्हाण यांचे नाव पुढे केले जाईल, असं सूत्रांच्या माहितीनुसार समोर येत आहेत. दरम्यान, फडणवीस यांना जर मुख्यमंत्री पद मिळाले तर चव्हाण यांना गृहमंत्री किंवा महसूल, वित्त मंत्रिपद मिळू शकते, अशी चर्चा आहे.
Maharashtra CM: फडणवीस नाही तर रवींद्र चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री, दिल्लीत चाललंय काय? तावडे-शाहांमध्ये बैठक
रवींद्र चव्हाण यांचा केडीएमसीचे नगरसेवक ते मंत्रिपद पर्यंतचा प्रवास
रवींद्र चव्हाण हे केडीएमसी नगरसेवक आणि सभापती राहिले असून डोंबिवली विधानसभेतून यावेळी चौथ्यांदा निवडून आले आहेत. रवींद्र चव्हाण यांनी रायगड, पालघर आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्रिपद भूषवलं असून मागच्या सरकारमध्ये ते पीडब्लूडी मंत्री राहिले आहेत.
महायुतीने कोकण पट्ट्यात ३९ पैकी ३५ जागा जिंकून कोकणातल्या विजयाचा स्ट्राईक रेट ९० टक्के नोंदवला आहे. त्याचे श्रेय प्रामुख्याने भाजपा नेते आमदार रवींद्र चव्हाण यांना जाते, कारण कोकण पट्ट्यातील जागा जिंकून आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती.
Ravindra Chavan: नगरसेवक ते मंत्रिपद; फडणवीसांचे निकटवर्तीय, सीएपदासाठी चर्चेत असलेले रवींद्र चव्हाण कोण?
- २००७ मध्ये भाजपचे नगरसेवक, काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता असतानाही भाजप नगरसेवक असूनही स्थायी समितीचे सभापती झाले
- २००९ मध्ये तत्कालीन भाजप आमदार हरिश्चंद्र पाटील यांचे तिकीट कापून भाजपची उमेदवारी मिळवली
- २०१४ मध्ये दुसऱ्यांदा आमदार
- २०१५ – १६ मध्ये कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर, उल्हासनगर, ठाणे, पनवेल, महापालिकेत भाजपचा बोलबाला, कर्जत, माथेरान, बदलापूर मध्ये भाजपचे यश, त्यामुळे रवींद्र चव्हाण यांनी राज्यमंत्री, रायगड,पालघर पालकमंत्रिपद मिळालं
- २०१९ मध्ये तिसऱ्यांदा आमदार
- २०२१ मध्ये शिंदे भाजप सरकार आणण्यात मोलाचा वाटा
- जून २०२१ मध्ये कॅबिनेट मंत्री पीडब्ल्यूडी खाते