Washim Crime News: गवळी कुटुंबीयांची नंधाना गावात शेती आहे. एकनाथ आणि नंदकिशोर गवळी यांनी शेतात सोयाबीन पेरले होते. त्याला खतपाणी देऊन वाढवले होते.
हायलाइट्स:
- मुलगा बेपत्ता असल्याची आई तक्रार
- लेक घरी येण्याची मायेला आस
- पण मृतदेह बघितल्यावर…
Mahayuti Manifesto 2024 : भाजपच्या जाहीरनाम्यात महिला आणि आशा सेविकांसाठी सर्वात मोठी घोषणा, नेमकी काय?
शेतातील सोयाबीन काढून नेल्याने केली हत्या
गवळी कुटुंबीयांची नंधाना गावात शेती आहे. एकनाथ आणि नंदकिशोर गवळी यांनी शेतात सोयाबीन पेरले होते. त्याला खतपाणी देऊन वाढवले होते. मात्र सोयाबीन काढणीला आल्यानंतर मृतक ऍड. रघुनाथ गवळी यांनी सोयाबीन काढून नेल्याने लहान दोन्ही भावांना त्याचा राग आला आणि रागाच्या भरात त्यांनी मोठ्या भावाची कुऱ्हाडीने हत्या केली आणि त्याचा मृतदेह ड्रममध्ये टाकून बुलढाणा जिल्ह्यातील खडकपुर्णा नदीत फेकून दिला.
बेपत्ता मुलगा घरी येण्याची आईला आस, मात्र त्याचा मृतदेहच…
बेपत्ता झालेला मोठा मुलगा घरी परत येईल अशी आस लाऊन बसलेल्या आई समोर त्याचा मृतदेहच आल्याने आणि धाकट्या मुलांनीच त्याची हत्या केल्याची माहिती समोर आल्याने आईला मोठा धक्का बसला. संपत्तीच्या वादातून सख्या भावाभावात भांडत होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. यातील काही भांडण टोकाला जाऊन जीवावर बेतत असल्याचं या घटनेतून निष्पन्न होते.