Balasaheb Thorat : थोरात यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’शी बोलताना थोरात-विखे वादावर भाष्य केले. हा वाद आता तिसऱ्या पिढीत सुरू असून त्याची चर्चा राज्यभर होत आहे.
थोरात यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’शी बोलताना थोरात-विखे वादावर भाष्य केले. हा वाद आता तिसऱ्या पिढीत सुरू असून त्याची चर्चा राज्यभर होत आहे. या पार्श्वभूमीवर ते म्हणाले, ‘थोरात विखे वादावर मी काही बोलण्यापेक्षा त्रयस्थ व्यक्तींनी याकडे पाहिले पाहिजे. लोकशाहीत मतमतांतरे असतात, हे मी समजू शकतो. लोकशाहीत राज्यघटनेनुसार त्यावर आक्षेप असण्याचे कारण नाही. राजकारणात महत्वाकांक्षा असल्याशिवाय ते पुढे जात नाही. मात्र, या सगळ्याला एक लक्ष्मण रेषा असली पाहिजे.’ ‘राजकारणात मतमतांतरे समजू शकतो. मात्र, त्याच्या मर्यादा सांभाळल्या पाहिजे.
शरद पवारांचं मिशन नाशिक; १२ नोव्हेंबरला जिल्ह्यात सहा जाहीर सभा, असा असेल दौरा…
दुर्देवाने आमच्या ‘मित्रां कडून तसे घडत नाही. त्रयस्थ व्यक्तींनी याकडे पाहावे आणि ठरवावे कोण योग्य आणि अयोग्य. आम्ही मर्यादा पाळतो आहोत. मात्र, मर्यादा ओलांडणाऱ्याच्याबाबतीत विरोध करायला आम्ही कमी पडत नाही. तरी या सर्व प्रकारावर एकच शेर आठवतो तो, ‘दुश्मनी जम कर करो लेकिन ये गुंजाइश रहे, जब कभी हम दोस्त हो जाएँ तो शर्मिंदा न हो.’ असा सल्लाही त्यांनी विखे पाटील यांना दिला.
Pune Crime: २४ वर्षीय महिलेचा बेडमध्ये सापडला मृतदेह, पुण्यातील घटनेनं खळबळ
‘दुसऱ्याला कमी लेखण्याची गरज नाही’
‘ही मर्यादा कुठली तर एकमेकांसमोर आलो तर आपल्याला बोलण्याची, हातात हात घेण्याची, नमस्कार करण्याची लाज वाटली नाही पाहिजे. आमच्या ‘मित्रा’कडून सातत्याने अतिरेक होत आला आहे. त्यातही सत्ता मिळाल्यानंतर साधनसामग्री जादा झाल्यानंतर त्यांनी दुसऱ्यांना मोडून काढायचे ठरवले. दुसरा कमी असतो असे समजण्याचे काही कारण नाही. त्याचे परिणाम त्यांनाच भोगावे लागत आहेत. या वादात पुढे जावे असे मला वाटत नाही,’ असेही त्यांनी आवर्जुन नमूद केले.