• Mon. Nov 25th, 2024
    …म्हणून मला आता बाळासाहेब थोरातांची कीव येते, विखे पाटलांची बोचरी टीका

    अहमदनगर: बाळासाहेब थोरात स्वत:ला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते समजतात. सांगलीच्या जागेसाठी अग्रह धरतात. मात्र याच थोरातांना आपल्या स्वत:च्या जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या जागा वाटपात लोकसभेची एकही जागा मिळविता आली नाही. त्यामुळे मला आता थोरातांची कीव येते, अशा शब्दांत भाजपचे ज्येष्ठ नेते, तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी थोरात यांच्यावर टीका केली.
    उमेदवारी जाहीर होण्याआधीच प्रचाराचा धडाका; लोकसभेला सामोरे जायचंय तर आधी कणकवलीकरांना सामोरा जातोय, नारायण राणेंची भावनिक साद
    नगर जिल्ह्यात विखे पाटील आणि थोरात यांच्यातील राजकीय संघर्ष जुनाच आहे. कोणतेही निमित्त साधून ते एकमेकांवर टीका करण्याची संधी सोडत नाहीत. आता लोकसभेला महाविकास आघाडीत झालेल्या जागा वाटपावरून विखे पाटील यांनी थोरातांवर टीका करण्याची संधी साधली आहे. संगमनेर तालुक्यात आयोजित एका कार्यक्रमात विखे पाटील यांनी ही टीका केली.

    कॅबिनेट बैठकीत झोपा काढतात काय? उन्मेश पाटील गिरीश महाजनांवर कडाडले

    विखे पाटील म्हणाले, महाविकास आघाडीच्या जागा वाटपात काँग्रेसवर मोठी नामुष्की आल्याचे दिसते. जेथे पक्षाचे प्राबल्य आहे, तेथील जागा मित्र पक्षांना सोडून दिल्या आणि जेथे पक्षाचे काम नाही, तेथे उमेदवार दिला आहे. काँग्रेस पक्षातील मूठभर लोकांनी स्वत:च्या फायद्यासाठी पक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे गहाण ठेवल्यासारखी परिस्थिती आहे. अनेक नेते स्वत:चे पद टिकवण्यासाठी काम करत असून त्यांना पक्षाचे काही घेणे देणे राहिले नसल्याचे दिसून येते. नगरचे थोरात स्वत:ला मोठे नेते समजतात, मात्र त्यांना नगर जिल्ह्यासाठी एकही जागा मिळविता आली नाही. उत्तर महाराष्ट्रात ८ जागा असताना तिथे ही काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही. यामुळे थोरातांनी काय काम केले? सांगलीच्या जागेसाठी आग्रही असणाऱ्या थोरातांनी स्वत:च्या नगर जिल्ह्यात पक्षाचे काय चालले आहे, याकडे लक्ष द्यावे, असा सल्लाही विखे पाटील यांनी थोरातांना दिला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed