• Fri. Mar 6th, 2026
    ड्रायव्हर सीट मागे करुन झोपलेला, पण तोंडातून फेस दिसताच लोकांची काच फोडली; कोकणात बंद कारमध्ये तरुणाची बॉडी सापडली

    Crime News : काही लोकांनी जवळ जाऊन पाहिलं, तेव्हा वैभव सावंतदेसाई हे कारची ड्रायव्हर सीट मागे करुन झोपलेल्या अवस्थेत दिसून आले

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    रत्नागिरी : रत्नागिरीत एका बंद असलेल्या कारमध्ये तरुणाची बॉडी आढळल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. रत्नागिरी शहरालगत असलेल्या एकदंत नगरकडे जाणाऱ्या फाट्याजवळ एका कारमध्ये शुद्ध हरपलेल्या अवस्थेत ४३ वर्षीय व्यक्ती आढळली होती. वैभव जयप्रकाश सावंतदेसाई (रा. नवेदरवाडी खेडशी, रत्नागिरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    नेमकं काय घडलं?

    मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवार, २ मार्च रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. एकदंतनगर फाट्याजवळ एक अर्टिगा कार (क्रमांक MH-08-AN-8904) बराच वेळ उभी होती. कारच्या काचांना बाष्प जमा झाल्याचे पाहून स्थानिक नागरिकांना संशय आला.काही लोकांनी जेव्हा जवळ जाऊन पाहिलं, तेव्हा वैभव सावंतदेसाई हे कारची ड्रायव्हर सीट मागे करुन झोपलेल्या अवस्थेत दिसून आले. नागरिकांनी त्यांना आवाज दिला, मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

    तोंडाला फेस, हालचाल बंद

    परिस्थितीचं गांभीर्य ओळखून उपस्थित नागरिकांनी गाडीची काच फोडली आणि दरवाजा उघडला. त्यावेळी सावंतदेसाई यांच्या शरीराची कोणतीही हालचाल होत नव्हती आणि त्यांच्या तोंडातून फेस आलेला होता. नागरिकांनी तातडीने त्यांना त्याच कारमधून जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं, मात्र रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केलं.
    Maharashtra TimesBhandup Accident : ड्रायव्हर संतोष सावंतने मुद्दाम बेस्ट बस भांडुप स्टेशनबाहेरील पादचाऱ्यांवर चढवली, 704 पानी आरोपपत्र दाखल
    या घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली. वैभव सावंतदेसाई यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचे कारण अद्याप अस्पष्ट असून शवविच्छेदन अहवालानंतरच अधिक माहिती समोर येईल. रत्नागिरी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

    देवा भाऊंचा चमत्कार आणि नितेश राणेचं स्वप्न पूर्ण, गाऱ्हाणं घालून रो रो सेवा सुरु

    सांगलीत बॅरलमध्ये शव आढळले

    दुसरीकडे, सांगली येथील इंदिरानगरमधील बेपत्ता असलेला बांधकाम मजूर रोहित मुकेश म्हैशाळे (वय २९) याचा खून करून त्याची बॉडी निळ्या रंगाच्या बॅरलमध्ये घालून विहिरीत टाकल्याचे उघडकीस आले आहे. शहरातील विठ्ठलनगर येथील एका पडीक विहिरीतून पोलिसांनी शव असलेले बॅरल गुरुवारी बाहेर काढले.
    Maharashtra TimesCrime News : कॉलेज विद्यार्थिनीच्या खोलीतच 25 वर्षीय बँक कर्मचाऱ्याने जीव दिला, तरुणीचा आरडाओरडा, निंबाळकर कुटुंब शोकसागरात
    या प्रकरणी पोलिसांनी दोन अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांची कसून चौकशी केली जात असल्याचे विश्रामबागचे पोलिस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी सांगितले. मृत रोहित म्हैशाळे याच्या खुनाचा आणि दलित महासंघाच्या मोहिते गटाचे उत्तम मोहिते यांच्या खुनाचा काही संबंध आहे का, या दिशेनेही पोलिस तपास करीत आहेत.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा