• Mon. Nov 25th, 2024

    नाशकात पारा चढला, आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर; रुग्णालयांत उष्माघात कक्ष सुरू

    नाशकात पारा चढला, आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर; रुग्णालयांत उष्माघात कक्ष सुरू

    शुभम बोडके, नाशिक : नाशिकमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात उन्हाचा तडाका वाढल्याचं पाहायला मिळत आहे. सरासरी नाशिकचे तापमान हे ४० अंश सेल्सियसपर्यंत पोहोचलं आहे. त्यामुळे नाशिक शहरात उष्माघाताचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. नाशिक शहरात मागील तीन दिवसांपूर्वी ३८.९ अंश सेल्सिअस तापमान होतं तर, ३७ ते ३८ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान हे स्थिर आहे. पुढील मे महिन्यात उन्हाचा चटका अधिक वाढणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. नाशिक महापालिकेकडून शासनाच्या सूचनेनुसार उष्माघाताचे बेड तयार राखण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

    दरम्यान, नाशिक महानगरपालिकेने रुग्णालयांमध्ये स्वतंत्र उष्माघात कक्ष सुरू केले आहे. नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयात १२, तर उर्वरित चार रुग्णालयांमध्ये प्रत्येकी चार असे एकूण २८ उष्माघाताचे बेड आरक्षित करण्यात आल्याची माहिती नाशिक मनपा वैद्यकीय अधीक्षक डॉ. तानाजी चव्हाण यांनी दिली. नाशिकरोड येथील ठाकरे रुग्णालयामध्ये १२ उष्माघाताचे बेड आरक्षित करण्यात आले आहे. डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात चार, मोरवाडी येथील स्वामी समर्थ रुग्णालयात चार, पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालय चार, तर मायको रुग्णालयामध्ये चार असे एकूण २८ बेडची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे आता नाशिक महानगरपालिकाची आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे.
    महाडमधील महायुतीच्या सभेत नेत्यांचा एल्गार; मविआच्या उमेदवारावर घणाघाती टीका, म्हणाले…
    दरवर्षीच्या तुलनेत यंदा उन्हाचा तडाका हा सर्वाधिक असल्याचं देखील पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता नाशिककरांना एप्रिल महिन्यात मे महिन्याप्रमाणे उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. त्यामुळे शहरात उष्माघाताच्या घटनेत वाढ होत असल्याने नाशिक महानगरपालिकेने देखील परिस्थितीचा अंदाज घेऊन नाशिकमध्ये विविध भागात उष्माघाताच्या बेडची संख्या वाढवून आरोग्य यंत्रणा सज्ज केलाचं पाहायला मिळत आहे. नाशिककर देखील वाढत्या उन्हामुळे गरजेच्या वेळातच घराबाहेर पडण्याचे पसंत करत आहे.
    पतीचा अपघातात मृत्यू, पत्नीने परिस्थितीसमोर हात टेकले, आयुष्याचा दोर कापण्याचा कटू निर्णय, चिमुकली पोरकी
    उष्माघाताची लक्षणे –
    मळमळ, उलटी, हात-पायांत गोळे येणे, थकवा येणे, ४० अंश सेल्सियसपर्यंत ताप येणे, त्वचा गरम होणे व कोरडी पडणे. क्वचित लाल होणे, घाम न येणे, डिहायड्रेशन, चक्कर येणे, निरुत्साही वाटणे, डोके दुखणे, छातीत धडधड होणे, रक्तदाब वाढणे, मानसिक बेचैनी, अस्वस्थता, बेशुद्धावस्था.

    गंगापूर धरणात फक्त ४७ % पाणीसाठा; नाशिककरांची तहान भागवण्याचं मोठं आव्हान, भीषण पाणी टंचाई

    उपचार पुढीलप्रमाणे –
    रुग्णास सावलीत आणावे, रुग्णाचे कपडे सैल करून त्वरित अंग थंड पाण्याने शरीराचे तापमान कमी होईपर्यंत पुसत राहावे. रुग्णास हवेशीर आणि थंड खोलीत ठेवावे, खोलीतील पंखे, कुलर, एअर कंडिशनर्स त्वरित चालू करावे. रुग्ण शुद्धीवर आल्यास त्यास थंड पाणी द्यावे. डिहायड्रेशन टाळावे, चहा, कॉफी देऊ नये. रुग्णाच्या काखेखाली आइसपॅक ठेवावेत. रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्या ठेवाव्या. शरीराचे तापमान ३६.८ सेल्सिअस तापमान होईपर्यंत उपचार सुरू ठेवावे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed