अजित पवारांना आणखी एक प्रश्न विचारला, तो म्हणजे शरद पवारांनी काल जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेतील उदासीनतेबाबत आणि प्रशासकीय दिरिंगबाबत अजित पवार यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली होती. वीस वर्षे मी केंद्रात होतो आता हे मी पाहून घेईन असे शरद पवार म्हणाले होते, त्यावर अजित पवारांनी उत्तर देताना एका वाक्यात सांगितलं आमच्या शुभेच्छा आहेत.
राज्यातील लोकसभेची निवडणूक ही मोदी विरुद्ध गांधी नसून मोदी विरुद्ध ठाकरे आहे असे संजय राऊत म्हणले होते, त्यावर अजित पवार हसले. अजित पवारांना काही काळ बोलताच आले नाही. अजित पवार म्हणाले की, काहीतरी सांगा. तुम्हाला तरी हे पटतं का? की ज्यांची बरोबरी करायची, अशी बरोबरीचा तरी माणूस सांगा. राज्याच्या बाहेर त्यांचा एकही माणूस नाही आणि ते मोदींची बरोबरी करायला चालले आहेत अशा स्वरूपात अजित पवारांनी उद्धव ठाकरेंना उपरोधिक टोला दिला.
विजय शिवतारे यांच्या ११ एप्रिल रोजीच्या सभेसंदर्भात अजित पवार म्हणाले, विजय शिवतारे यांच्याबरोबर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी एकत्र बसून चर्चा केली होती. शिवतारे यांनी सांगितलं की, ज्या गोष्टीसाठी आपण उमेदवारी अर्ज भरतो आहोत, त्याची माहिती दिली पाहिजे. त्याचबरोबर त्या लोक हिताच्या निर्णयाची माहिती देखील लोकांना दिली पाहिजे. त्या दृष्टीने सर्वांनी चर्चा केली आणि ११ एप्रिल रोजी याची जाहीर सभा सासवड येथे नियोजित करण्यात आली आहे.