• Mon. Nov 25th, 2024
    संजय मंडलिक आणि संभाजीराजे अचानक आमनेसामने, व्हिडिओ व्हायरल

    कोल्हापूर: लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजलं आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीकडून उमेदवार देखील जाहीर झाले आहेत. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात दोन्ही उमेदवारांचे प्रचार मोठ्या ताकतीने सुरू असून घरातील सर्व मंडळी झोकून देऊन काम करत आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांचे सुपुत्र संभाजीराजे छत्रपती आपल्या वडिलांच्या प्रचारासाठी गावं पिंजून काढत आहेत. तर दुसऱ्या बाजूला महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक हे देखील प्रत्येक गावात जात मतदारांची आणि कार्यकर्त्यांची भेट घेत आहेत.
    १० वर्षात भाजपने काही केलं नाही, प्रणिती शिंदेंची विचारणा, राम सातपुतेंनी प्लानच सांगितला म्हणाले…
    अशातच आज संभाजी राजे छत्रपती आणि संजय मंडलिक एका सुनियोजित कार्यक्रमादरम्यान एकमेकांसमोर आले. हे चित्र पाहून सर्वांच्या नजरा या दोघांवर थांबल्या होत्या. विरोधात असलेले उमेदवार आणि मुलगा एकत्र आल्याने नेमकी येथे काय चर्चा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र दोघेही हास्य आणि हस्तांदोलन करत काही काळ चर्चा केली आणि दोघेही मार्गस्थ झाले. कोल्हापूर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांचे सुपुत्र संभाजी राजे आणि महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक दोघेही आज राधानगरी तालुक्यातील सरवडे येथील गोकुळचे संचालक व बिद्रीचे माजी उपाध्यक्ष लोकनेते स्व. विजयसिंह कृष्णाजी मोरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणास अभिवादन करण्यासाठी कार्यकर्त्यांसह आले होते. सुनियोजित होता मात्र वेळ वेगवेगळी होती.

    तुमच्याकडे एवढी ताकद होती तर मला मशाल चिन्ह घ्या म्हणून का सांगत होता? राजू शेट्टींचा सतेज पाटलांना सवाल

    मात्र दोघेही अचानक एकमेकांसोबत आल्याने या दोघांमध्ये की काय चर्चा होणार? याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले. मात्र दोघांनीही एकमेकांसमोर येताच फक्त हस्तांदोलन केले आणि निवडणूक विषयांवर कोणतेही भाष्य न करता अगदी हसतखेळत अनऔपचारिक गप्पा मारल्या. यावेळी छत्रपती संभाजीराजे यांनी संजय मंडलिक यांनी कपाळावर लावलेला भंडारा पाहून हाताने खुणवत भाष्य केलं आणि दोन्ही बाजूचे कार्यकर्ते हसू लागले. यानंतर दोघांनीही फोटो काढत एकमेकांना शुभेच्छा देत मार्गस्थ झाले. मात्र या भेटीचा व्हिडिओ आता सोशल मीडियामध्ये व्हायरल होऊ लागला आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *