इराण विरुद्ध इस्त्रायल अमेरिकेच्या युद्धाला आज ११ दिवस होत आहेत. युद्धातून अजूनही तोडगा निघालेला नाही. या युद्धाची झळ आता महाराष्ट्राला बसायलाही याची झळ बसायला लागली आहे. या युद्धामुळे महाराष्ट्रात आता गॅसचा तुटवडा जाणवू लागला आहे. सरकारने सर्वसामान्य लोकांचं नुकसान होऊ नये यासाठी घरगुती गॅस सिलिंडरला प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर घरगुती गॅस सिलिंडरसाठी 25 दिवस वाट पाहावी लागणार आहे. ज्यांचा आधीच गॅस संपला आहे अशा लोकांना मात्र आता अडचणींचा सामना करावा लागत आहे. गॅस सिलिंडर मिळवण्यासाठी धडपड सुरू आहे. यासाठी लोकांना मोठी कसरत करावी लागत आहे. तर दुसरीकडे व्यावसायिक वापराच्या गॅसचा अपुरा पुरवठा होत असल्यानं मुंबईतील २० टक्के हॉटेल्स बंद ठेवण्याची वेळ येणार आहे. सध्या हॉटेल चालकांनी मेन्यूवर मर्यादा आणल्या आहेत जर पुरवठा पूर्ववत झाला नाही तर ५० टक्के हॉटेल्स बंद होण्याची वेळ येऊ शकते. राज्यात कुठे-कुठे गॅस सिलिंडरचा तुडवडा आहे आणि कुठे काय परिस्थिती आहे ती जाणून घेऊया