अद्यापपर्यंत उमेदवारी जाहीर होत नाही. लोकसभा उमेदवारी बिनविरोध करण्यासाठी खेळी केली काय? तुमच्यासमोर कोणाचीही उमेदवारी जाहीर केलेली जात नाही, यावर उदयनराजे म्हणाले, तसे त्यांचे माझ्यावर प्रेम आहे. त्यामुळे तेही सगळे विचार करतायेत की जाऊ देत. बच्चा समझ के छोड दिया… असे जरी म्हणत असले तरी दुसरी बाजू अशी आहे लहान होतो ठीक आहे. आता बच्चा राहिलो नाही. मला माझं तर कार्य केलं पाहिजे. त्यांना त्यांचं कार्य केलं पाहिजे, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
राजकारणाच्या रेसमध्ये कुठल्या गाड्या धावताहेत असे वाटते? त्यावर उदयनराजे म्हणाले, मला माझी गाडी माहिती आहे. इतरांची कुठली धावणार आहे हे काय माहित नाही. ज्याला ज्याची इच्छाशक्ती आहे, त्यांनी त्यांच्या गाड्या घेऊन फिराव्यात, असे मिश्किल उत्तर त्यांनी दिले.
उदयनराजे म्हणाले, सगळ्यांबरोबर मैत्रीपूर्ण संबंध आहेत. वैचारिक मतभेद असू शकतात, पण त्यांचे विचार त्यांच्याजवळ, माझे विचार माझ्याजवळ! चर्चेतून आपण मार्ग काढू शकतो आणि मग कोणाला कमी लेखायचा विषय येत नाही. प्रत्येक जण आपापल्या ठिकाणी मोठा आहे. शशिकांत शिंदे, श्रीनिवास पाटील, पृथ्वीराज चव्हाण ही सर्व माझी मित्रमंडळी आहेत. श्रीनिवास पाटील म्हणजे आमच्या वडिलांचे खास दोस्त. त्यांचा आशीर्वाद निश्चितपणे अपेक्षित आहे. ज्यांना कुणाला उभे राहायचे आहे, त्यांना राहू द्या! एक चांगलं झालं.. सगळे म्हणतात… पावसामुळे सगळं झालं! देवाची कृपादृष्टी आहे. राजकारण सोडून द्या, पण महत्त्वाचा प्रश्न आहे तो पाण्याचा… आज धरणाची पातळी पाहिली, तर ती इतकी खालावली आहे. आता कधीतरी पाऊस पडला पाहिजे. काही लोक म्हणत असतील निवडणुकीच्या काळात पडू द्या… पडला तर योग्यच आहे!
साताऱ्याच्या विकासाबाबत उदयनराजे म्हणाले, जेव्हा तुम्ही विकासाच्या गोष्टी करता त्या अपेक्षितच आहेत. जिल्ह्यातील लोकसंख्या पाहता प्रश्न वाढत जातात आणि विकास हा कधी थांबू शकत नाही. विकासही ऑन गोइंग प्रोसेस आहे, ती चालूच राहत असते.
शरद पवारांनी तुमची कॉलरची उडवण्याची स्टाईल केली हे एक तुम्हाला त्यांनी आव्हानच दिले का? त्यावर उदयनराजे म्हणाले, काय बोलणार! ते वडीलधारी आहेत. माझे बारसे जेवलेल्या लोकांबद्दल काय बोलणार, कॉलरबाबत टीकाही झाली. कॉलर आता घातली. कॉलर काढून घ्या… काय पण काढून घ्या. माझ्यावर लोकांचा जीव आहे, तोपर्यंत कोणीच काढून घेऊ शकणार नाही.
भाजपकडून तिकीट जाहीर केलेले नाही. काही घातपात होऊ शकतो का? यावर उदयनराजे म्हणाले, लोकांमध्ये जोपर्यंत आहे, तोपर्यंत ठीक आहे. जोपर्यंत आपल्यात ताकद आहे, तोपर्यंत लोकांची सेवा करणार. मग बघू सगळं नंतर.
पक्षाकडून उमेदवारी जाहीर होईल का? असे विचारले असतात उदयनराजे म्हणाले, किंगबेरीच्या गुहेत गेले की सगळे पक्षी बघतील. आता ते पक्षी काय ठरवतील ते कळेल! ते तर माझ्याबरोबर आहेत. बाकी मला काही माहित नाही, असे मिश्किल उत्तर त्यांनी दिले.