• Mon. Nov 25th, 2024

    नियुक्तीपत्र टेक्निशयनचे पण काम दिले प्लम्बिंगचे, कंपनीकडून इंजिनिअरची फसवणूक

    नियुक्तीपत्र टेक्निशयनचे पण काम दिले प्लम्बिंगचे, कंपनीकडून इंजिनिअरची फसवणूक

    म.टा. प्रतिनिधी, नागपूर : मेट्रोत टेक्निशियन पदाचे नियुक्तीपत्र देऊन प्लम्बिंगचे काम करायला लावत अभियंत्याची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी सूत्रधार व कंपनीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

    काय आहे प्रकरण?

    -जय अनिल प्रचंड (रा. दत्तवाडी) व विराध्या इन्फाटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. शुभम सोमेश्वर दांडेकर (वय २९, रा. न्यू ओमनगर) याने दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला.

    -शुभमचे एमएसस्सी कम्प्युटर सायन्सचे शिक्षण पूर्ण झाले असून, सध्या तो हैदराबाद येथील एका सॉफ्टवेअर कंपनीत अभियंता आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोन वर्षांपूर्वी शुभम हा नोकरीच्या शोधत होता.

    -त्याच्या वडिलाने मित्र प्रवीण फुसे (रा. शिश्वकर्मानगर) यांच्याकडे शुभमच्या नोकरीबाबत विचारणा केली. फुसे यांनी बंटी रामटेके यांना याबाबत सांगितले. बंटी रामटेके यांच्या श्यामनगर येथील घरी जय प्रचंडसोबत शुभम व त्याच्या वडिलांची ओळख झाली.

    -मेट्रो रेल्वेचे बडे अधिकारी आपल्या ओळखीचे असल्याचे जयने सांगितले. शुभमला मेट्रो रेल्वेत टेक्निशियनची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले. यासाठी चार लाख रुपयांची मागणी केली. नियुक्तीपत्र मिळाल्यानंतर ही रक्कम द्यावी लागेल, असेही तो म्हणाला.

    -जयने आधी दहा हजार रुपये घेतले. २ जुलै २०२२ला जयने शुभमच्या मोबाइलवर संपर्क साधला. ‘नियुक्तीपत्र तयार झाले आहे. एकदा काय काम आहे ते बघून घे’, असे म्हणाला. त्यानंतर बंटी रामटेके, शुभम हे दोघे जयच्या कारने सीताबर्डी मेट्रो स्थानकावर गेले.
    लिव्ह इन रिलेशनशीपचा भयंकर ‘द एण्ड’, प्रेयसीला प्रियकराने निर्घृणपणे संपवलं, नागपुरातील घटना
    -तेथे जयने शुभमला कामकाजाची माहिती दिली. तिघेही पार्किंगमध्ये आले. जयने शुभमला नियुक्तीपत्र दिले. विराध्या इन्फ्रोटेक कंपनीच्या लेटरहेडवर नियुक्तीचा मजकूर होता. शुभमच्या वडिलांनी जयला उर्वरित ३ लाख ९० हजार रुपये दिले.

    -पैसे दिल्यानंतर शुभमने कामावर जाण्यास सुरुवात केली. मात्र, त्याला टेक्निशियनऐवजी नळ फीटिंगचे काम देण्यात आले. येथे १५ दिवस काम केल्यानंतर पर्यवेक्षक पवनने शुभमला प्रजापतीनगर मेट्रो स्थानकावर पाठविले. तेथेही त्याला प्लम्बिंगचे काम सांगण्यात आले.

    -संतापलेल्या शुभमने जयसोबत बोलणे केले. त्याने शुभमची समजूत घातली. त्यानंतरही त्याला हेच काम देण्यात आले. शुभमने नोकरी सोडली व जयला पैसे परत मागितले. त्याने ४३ हजार रुपये परत केले. उर्वरित रक्कम देण्यास टाळाटाळ केली. शुभमने हुडकेश्वर पोलिसांत तक्रार केली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *