Pune Accident Shiv Jayanti 2026 : पुण्यातील मावळमध्ये भीषण अपघात झाला आहे. एका कारने दोन शिवभक्तांना चिरडले. काल गुरुवारी रात्री दीड वाजता हा अपघात झाला. या अपघातामुळे मावळ परिसरात शोककळा
नेमका कसा झाला अपघात?
शिवजयंतीच्या निमित्ताने गावात शिवज्योत आणण्याची परंपरा असल्यामुळे हे दोघे आणि त्यांचे काही मित्र विसापूर किल्ल्यावर गेले होते. तेथून शिवज्योत घेऊन हे तरुण आपल्या गावाच्या दिशेने धावत निघाले होते. मात्र, मध्यरात्रीच्या सुमारास जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील नायगाव परिसरात दुर्दैवी घटना घडली. ओंकार आणि दर्शन हे रस्त्याच्या कडेला शिवज्योत घेऊन धावत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका भरधाव कारने अचानक दुभाजक ओलांडला आणि दोघांनाही जबर धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दोघे तरुण दूर फेकले गेले. आसपासच्या लोकांनी तातडीने धाव घेतली, मात्र तोपर्यंत दोघांचाही जागीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला.
Ratnagiri Accident: शिमगोत्सवासाठी मुंबईहून कोकणात निघाले, पहाटे खासगी बसला भीषण अपघात; 28 प्रवाशांसह बस उलटली
शिवजयंतीच्या दिवशीच दोन तरुण शिवभक्तांचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने शिंदेवाडी आणि मावळ परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, अपघाताला कारणीभूत ठरलेल्या कार चालकाविरोधात कारवाईची प्रक्रिया सुरू असून पोलिस पुढील तपास करत आहेत.
शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत बदल
छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या जयंतीनिमित्त शुक्रवारी (६ मार्च) शहरातील मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणात मिरवणुका निघणार असल्याने वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. सकाळी सात वाजल्यापासून लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, नेहरू रस्ता आणि बाजीराव रस्ता या मार्गांवरील वाहतुकीत बदल करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक शाखेकडून देण्यात आली.
Baramati Crime : व्हिडिओ कॉलवर ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती, वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची सायबर फसवणूक
शिवजयंतीनिमित्त लक्ष्मी रस्ता आणि शिवाजी रस्ता परिसरात मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम बाजीराव रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता, तसेच लष्कर वाहतूक विभागाच्या हद्दीतील महात्मा गांधी रस्ता आणि ‘ईस्ट स्ट्रीट’ या प्रमुख मार्गांवर होण्याची शक्यता आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी विविध ठिकाणी वाहतूक वळविण्याचा निर्णय घेतला आहे. जिजामाता चौकातून शिवाजी रस्तामार्गे स्वारगेटकडे जाणारी वाहने स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रस्तामार्गे खंडोजीबाबा चौक, टिळक चौक आणि टिळक रस्ताकडे वळविण्यात येणार आहेत. वारूळा पुलाकडून फडके हौद चौक आणि जिजामाता चौकाकडे येणारी वाहने दारूवाला पुल चौकातून पुढे सोडण्यात येतील.
