• Sun. Nov 10th, 2024
    घर फोडलं, आईसमान वहिनीला निवडणुकीत उतरवलं, सुप्रिया सुळेंनी भाजपला ऐकवलं

    पुणे: यंदाच्या लोकसभा निवडणुकीत एक मतदारसंघ सर्वाधिक चर्चेत आहे. तो म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघ. राष्ट्रवादीचे दोन गट पडल्यानंतर या मतदारसंघात नणंद-भावजय अशी लढत होणार याची चर्चा फार पूर्वीपासून सुरु होती. अखेर तेच घडलं, राष्ट्रवादी पक्षाने खासदार सुप्रिया सुळेंना बारामतीतून उमेदवारी दिली. त्यानंतर लगेच १५ मिनिटांत सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेत सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जाहीर केली. यावर सुप्रिया सुळे यांनी भाजपवर घर फोडल्याचा गंभीर आरोप केला आहे. भाजपने आईसमान वहिनीला निवडणुकीत उतरल्याचं त्या म्हणाल्या.

    माझं काम बघून मला मतदान करा – सुप्रिया सुळे

    माझं लोकसभेतील काम देशाने पाहिले. लोकांचं प्रेम आणि जे सहकार्य मला मिळालं, त्यामुळे मला आज पुन्हा एकदा संधी मिळाली आहे. मला मेरीटवर मला मतदान करा, माझं काम पाहून, माझा संपर्क पाहून आणि माझ्या आजपर्यंत कुठलाही भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही.

    भाजपने आमचं घर फोडलं – सुप्रिया सुळे

    भाजपचे नेते बारामतीत येऊन म्हणतात की आम्हाला निवडणुकीत शरद पवारांना हरवायचं आहे. त्यामुळे त्यांना विकास नकोय. ना त्यांच्याकडे उमेदवार आहे. मग आमचं घर फोडून आमच्या घरातली एक महिला त्यांना पाहिजे. मोठी वहिनी ही आईसमान असते. माझ्यावर जे संस्कार झाले आहेत, त्यानुसार मोठ्या भावाची पत्नी ही आईसारखी असते. त्यामुळे आमच्या आईला त्यांना निवडणुकीत उतरवावं लागतेय, याचा विचार करा, असं म्हणत त्यांनी भाजपला सुनावलं आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed