• Sat. Sep 21st, 2024
खेडमधून उमेदवारी नाकारली अन् आढळराव शिवसेनेत गेले, २० वर्षांनी राष्ट्रवादीत घरवापसी

पुणे : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता जोर धरू लागली आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर दोन गट पडले. त्यात आता शिरूर लोकसभा मतदारसंघातून दोन्ही पवारांचे अस्तित्व पणाला लागणार आहे. कारण शरद पवार यांच्याकडून डॉ. अमोल कोल्हे यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर अजित पवार यांच्याकडून शिवाजीराव आढळराव पाटील यांना उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे. तब्बल २० वर्षांच्या कालावधीनंतर आढळराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घरवापसी करत आहेत.

मंचर येथे उद्या, मंगळवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पक्षप्रवेश पार पडणार आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे शिवाजीराव आढळराव पाटील विरुद्ध शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे अशी लढत निश्चित मानली जात आहे.
फडणवीसांचे एका दगडात अनेक पक्षी? जानकरांचं अस्त्र पवारांवरच उलटवणार, बारामतीतून उमेदवारीची शक्यता
आंबेगाव तालुक्यात दिलीप वळसे पाटील, शिवाजीराव आढळराव पाटील आणि देवेंद्र शहा यांची मैत्री सर्वांना माहिती आहे. शिवाजीराव आढळराव पाटील हे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष होते. मात्र ज्यावेळी २००४ चा निवडणुकीत आढळराव पाटील यांना खेड मतदारसंघातून उमेदवारी नाकारण्यात आली. त्यावेळी आढळराव पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. २००४ साली मोठ्या मताधिक्याने ते निवडून आले होते.
डोळ्यात दिवंगत पतीची आठवण, लेकाला घट्ट मिठी, अश्रू सावरत प्रतिभा धानोरकर म्हणतात, प्रत्येक वळणावर त्यांची उणीव…
त्यानंतर आता तब्बल २० वर्षानंतर आढळराव पाटील हे स्वगृही परतत आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात विधानसभेचे राजकारण देखील बदलल्याचे पहायला मिळणार आहे.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

२०१९ मधील पराभवाचा वचपा काढण्यासाठी शिवाजीराव आढळराव पाटील हे निवडणूक लढवत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे येणारी निवडणूक अस्तित्व दाखवणारी आहे. शिरूर लोकसभेत अनेकांचे अस्तित्व पणाला लागले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed