Bhimashankar Temple Opened For BJP MP Nishikant Dubey: एरवी वन विभाग आणि इतर विभागांकडून भाविकांना अनेक चेक पोस्टवर तपासणी करून भीमाशंकरला पोहोचावे लागते. मात्र, ‘व्हीआयपीं’ना यामधून सूट मिळत असल्याचे या प्रकरणामुळे समोर आले आहे.
खासदार डॉ. दुबे हे झारखंडमधील गोड्डा लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. ते शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास हेलिकॉप्टरने भीमाशंकर येथे आले. त्यानंतर त्यांच्यासाठी मंदिर खुले करून व्हीआयपी दर्शन देण्यात आल्याचे स्थानिकांनी सांगितले. मात्र, मंदिर सर्वसामान्य भाविकांसाठी बंद असताना खासदारांसाठी ते खुले कसे करण्यात आले, असा प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे. यामागे मंदिर ट्रस्टमधील कोणाचा सहभाग आहे का, स्थानिक अधिकारी यामध्ये सहभागी आहेत, याची चौकशी करण्याची मागणी होत आहे.
Pune Crime : “तू गोवऱ्या आणि लाकडे फुकट का दिलीस?”, जाब विचारत स्मशान कर्मचाऱ्यावर हल्ला
सभामंडप व पायरी मार्गाच्या बांधकामामुळे भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांनी नऊ जानेवारी २०२६ पासून तीन महिन्यांसाठी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला स्थानिक नागरिक, भाविक; तसेच सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनीही सहमती दर्शवली होती. ऐन महाशिवरात्रीच्या काळातही भाविकांना या ठिकाणी दर्शनासाठी सोडले नाही. यात्राही रद्द करण्यात आली होती. दर्शनासाठी कोणालाही प्रवेश देण्यात येत नव्हता. हजारो किलोमीटर पायी व सायकलवारी करून येणाऱ्या भाविकांनाही दर्शन न घेता परत जावे लागत आहे. मात्र, अशा परिस्थितीत एका नेत्यासाठी मंदिर खुले केल्याने प्रशासनावर दुजाभाव केल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, खासदार डॉ. दुबे हे दिल्लीच्या मर्जीतील नेते मानले जातात. यामुळे त्यांचा भीमाशंकर दौरा आणि मंदिर उघडण्यामागील कारणांबाबत वादंग सुरू झाल्याची चर्चा आहे.
Pune Crime: पुण्यात टिपू पठाण टोळीवर पुन्हा मोक्का; खंडणी रॅकेटचा पर्दाफाश, फरार ‘पच्चीस’ गजाआड
वादग्रस्त वक्तव्यांमुळे दुबे चर्चेत
‘मराठींना आपटून मारू, राहुल गांधी पिकनिकला येतात, मुंबईला टॅक्स देणाऱ्यांमध्ये आमचे योगदान आहे, ठाकरे परिवाराचे काही देणे नाही,’ अशा अनेक वादग्रस्त वक्तव्यांमुळे खासदार डॉ. निशिकांत दुबे चर्चेत आले होते.
खासदार डॉ. निशिकांत दुबे भीमाशंकर दर्शनाला येणार असल्याबाबत आम्हाला कोणतीही कल्पना नव्हती. आम्ही यासाठी परवानगी दिलेली नाही. हा प्रकार भीमाशंकर मंदिर ट्रस्टच्या कोणा व्यक्तीकडून झाला असेल किंवा काय याचा शोध घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल. – जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी
