• Mon. Nov 25th, 2024

    राज ठाकरेंचा प्रस्ताव, शिंदेंचा ‘मनसे’ विरोध; राज्य भाजपचे प्रयत्न फेल, ‘शाही’ तोडगा निघणार?

    राज ठाकरेंचा प्रस्ताव, शिंदेंचा ‘मनसे’ विरोध; राज्य भाजपचे प्रयत्न फेल, ‘शाही’ तोडगा निघणार?

    मुंबई: महायुतीत तीन पक्ष असल्यानं जागावाटपाचा तिढा कायम असताना आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संभाव्य एन्ट्रीमुळे पेच आणखी वाढला आहे. मनसेप्रमुख राज ठाकरेंनी दोन जागांची मागणी केली आहे. पण या मागणीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाम विरोध आहे.

    महायुतीत चौथा भिडू म्हणून येत असलेल्या मनसेला दोन जागा सोडण्यास शिंदेंचा प्रचंड विरोध आहे. याबद्दल राज्य भाजपच्या नेतृत्त्वानं शिंदेंचं मन वळवण्याचा प्रयत्न केला. पण शिंदे कोणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. त्यामुळे आता केंद्रीय मंत्री अमित शहा या सगळ्या प्रकरणात लक्ष घालणार आहेत. राज ठाकरेंनी दोनच दिवसांपूर्वी दिल्लीत अमित शहांची भेट घेतली. ४० मिनिटांच्या बैठकीत राज आणि अमित शहांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबद्दल चर्चा झाली. या बैठकीला राज यांचे पुत्र अमित ठाकरे उपस्थित होते.
    अमरावतीत भाजपचाच उमेदवार, बावनकुळेंनी ठामपणे सांगितलं; राणा, अडसूळांचं काय? तिढा कायम
    मनसेला सोबत घेण्यास भाजप उत्सुक आहे. राज यांनी भाजपकडे दोन जागांची मागणी केली आहे. दक्षिण मुंबईसाठी मनसे प्रामुख्यानं आग्रही आहे. यासोबतच शिर्डी, नाशिक या मतदारसंघांची मागणीही राज यांनी केली आहे. शिर्डी, नाशिकपैकी एक मतदारसंघ मनसेसाठी सोडावा, असा आग्रह राज यांनी धरला आहे. पण राज यांच्या मागणीला शिंदेंचा विरोध आहे.
    शिवसेना सोडण्यास तयार, पण लोकसभा लढवणारच! बापू उमेदवारीवर ठाम, अजितदादांचं टेन्शन वाढणार
    राज यांनी मागितलेल्या तिन्ही जागा शिवसेनेच्या आहेत. नाशिक, शिर्डीचे खासदार शिंदेंसोबत आहेत. तर दक्षिण मुंबईची जागाही शिंदेंना हवी आहे. गेल्या निवडणुकीत ही जागा शिवसेनेनं जिंकली. अरविंद सावंत इथले खासदार आहेत. पक्षफुटीनंतर सावंत यांनी उद्धव ठाकरेंची साथ दिली. सावंत यांनी २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे तत्कालीन उमेदवार मिलिंद देवरांचा पराभव केला. देवरांनी दोन महिन्यांपूर्वीच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आलं. दक्षिण मुंबईतून देवरांनी निवडणूक लढवावी असं शिंदेंना वाटतं.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *