• Fri. Nov 29th, 2024
    देवेंद्र फडणवीसांच्या भेटीत नेमकं काय घडलं?

    नांदेड: आपल्या सुनबाईला उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांची नाराजी अखेर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर दूर झाली आहे. शुक्रवारी मेव्हणे अशोक चव्हाण यांच्या शिष्टाईमुळे खतगावकर यांनी फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेतली. यावेळी भाजपचे उमेदवार तथा विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे देखील उपस्थित होते. या भेटीनंतर नाराजी दूर झाल्याने माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर हे भाजप उमेदवाराच्या प्रचाराच्या कामाला देखील लागले आहे.
    मी बारामतीतून उमेदवारी लढवणार हे निश्चित, निवडणुकीसाठी विजय शिवतारेंनी शड्डू ठोकला
    डॉ. मीनल खतगावकर ह्या माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या सुनबाई आहेत. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भाजपवासी झाल्यानंतर माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी देखील आपल्या समर्थकांसह भाजपात प्रवेश केला होता. त्यातच त्यांच्या सुनबाई डॉ. मीनल यांचं नाव भाजपकडून लोकसभेसाठी चर्चेत होत. मीनल खतगावकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याने उमेदवाराच्या रेसमध्ये होत्या. शिवाय त्यांना उमेदवारी मिळावी यासाठी भाजपच्या एका गटाकडून प्रयत्न देखील सुरु होते.मात्र भारतीय जनता पक्षाने विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकरांना दुसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केली. इकडे आपल्या सुनबाईला उमेदवारी न मिळाल्याने माजी खासदार खतगावकर आणि त्यांचे समर्थक हे नाराज होते. भाजपच्या सर्व कार्यक्रमात जाणं त्यांनी टाळलं होतं. खतगावकर यांच नायगाव बिलोली आणि देगलूर विधानसभा मतदार क्षेत्रात चांगली पकड आहे. शिवाय इतर मतदार क्षेत्रात ही त्यांना मानणारा वर्ग मोठा आहे. त्यामुळे भाजपला नुकसान होऊ नये, यासाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दाजीच्या मनधरणीसाठी पुढाकार घेतला.

    ना पद, ना उमेदवारी, वेगळी भूमिका घ्या; रामराजेंकडे भर मंचावर कार्यकर्त्याची मागणी

    शुक्रवारी अशोक चव्हाण, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, खासदार प्रताप पाटील चिखलीकर आणि माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांनी तात्काळ मुंबईला रवाना झाले. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. भेटीदरम्यान काय चर्चा झाली आणि फडणवीस यांनी खतगावकर यांना काय आश्वासन दिले हे मात्र समजू शकले नाही. दरम्यान नाराजी दूर झाल्यानंतर खतगावकर हे शनिवारी सायंकाळी देगलूर तालुक्यात खासदार चिखलीकर यांच्या प्रचारासाठी कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत. शिवाय त्यांना मार्गदर्शन देखील करणार आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed