• Fri. Nov 29th, 2024
    बैलाचा दोर हातात घेतला, बैल सुस्साट सुटला, चिमुकल्याला फरफटत नेलं; पुण्यातील शौर्यचा मन हेलावणारा अंत

    Pune Haveli Death of a Child: शौर्य शैलेश वागस्कर (वय ८) असं मृत्यू झालेल्या चिमुलकल्याचे नाव असून सोमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला होता. पालकांनी तो जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल केले होते.

    हायलाइट्स:

    • बैलाचा दोर हातात घेतला, बैल सुस्साट सुटला
    • आठ वर्षीय चिमुकल्याला फरपटत नेलं
    • पुण्यातील शौर्यचा मन हेलावणारा अंत
    Lipi
    बैलाने ओढल्याने मुलाचा मृत्यू

    प्रशांत श्रीमंदीलकर, पुणे : पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात असणाऱ्या फुलगाव गावातून अंगावर शहारे आणणारी एक घटना समोर आली आहे. अंगणात खेळत असणाऱ्या आठ वर्षाच्या मुलाच्या हातात बैलाला बांधलेली दोरी अडकली. नेमकं त्याचवेळी बैल पळत सुटल्याने त्या दोरीबरोबर मुलगा देखील फरपटत गेला. या घटनेत चिमुकला जखमी होऊन त्या मुलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे हवेली तालुक्यात शोककळा पसरली आहे.शौर्य शैलेश वागस्कर (वय ८) असं मृत्यू झालेल्या चिमुलकल्याचे नाव असून सोमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला होता. पालकांनी तो जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

    घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शौर्य हा अंगणात खेळत होता. खेळत असताना त्याने अंगणातील बैलाला बांधलेली दोरी हातात घेतली. त्यावेळी बैल घाबरल्याने तो पळत सुटला आणि ही दोरीने शौर्यच्या गळ्याभोवती आणि अंगावर फास बसला. यामुळे तो बैलाच्या मागे दोरीमुळे फरपटत ओढला गेला. काही अंतरापर्यंत त्याला बैलाने फरपटत नेले. त्यात त्याला जबर मार लागला आणि ज्यावेळी घटना घडली त्यावेळी शौर्यचे पालक घरात होते.

    बाहेर कसला तरी आवाज आल्याने ते धावत बाहेर आले. शौर्यला त्यांनी जखमी अवस्थेत पहिले. त्याला त्यांनी तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपाचरापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. शौर्य हा फुलगाव येथील शाळेत दुसऱ्या इयत्तेत शिकत होता. तर घरात तो एकुलता एक मुलगा होता. त्याच्या जाण्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. या प्रकरणी लोणीकंद पोलिसांनी आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली आहे.

    मोक्यातील इंधन माफिया गजाआड

    पुण्यातील लोणी काळभोर येथील अधिकृत कंपनीतील इंधन टँकरचे जीपीएस हॅक करून चोरी विक्री करणारा इंधन माफियाला पोलिसांनी गजाआड केले. पेट्रोल डिझेलची विक्री करणारा मुख्य सराईत आरोपी मागील दोन महिन्यापासून पोलिसांना चकवा देत होता, अखेर पुण्यात वकिलाला भेटायला आलेल्या आरोपीला सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयातील पोलीस पथकाने शिताफीने अटक केली.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed