• Thu. Jun 11th, 2026
    कर्ज फेडण्यासाठी गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडनं केलं तरुणीचं अपहरण, मुलीच्या आईला कॉल करून सांगितलं…

    नागपूर : राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयएचे) अधिकारी असल्याचे सांगून प्रेमीयुगुलाने तरुणीचे अपहरण केले. पोलिसांनी वेळीच हालचाली करून अपहरण तरुणीची सुटका करून प्रेमीयुगुलाला बेड्या ठोकल्या. स्वप्निल दिलीप मरसकोल्हे (वय २४) आणि चेतना (वय २३, दोन्ही रा. हिंगणा), अशी अटकेतील प्रेमीयुगुलाचे तर तर झलक (वय २३ रा. प्रतापनगर) असे अपहरण झालेल्या तरुणीचे नाव आहे.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, झलकचे वडील पारशिवनीतील कोळसा खाणीत कार्यरत असून, ती हिंगण्यातील एका कंपनीत काम करते. गेल्या अनेक दिवसांपासून स्वप्निल व त्याची प्रेयसी झलकच्या पाळतीवर होते. २० मार्च रात्री काम आटोपल्यानंतर झलकने आईच्या मोबाइलवर संपर्क साधला. काम आटोपले आहे. १० वाजतापर्यंत घरी परत येते, असे तिने सांगितले. ती मोपेडने घरी जायला निघाली. दोघांनी तिला अडवले. ”आम्ही एनआयएचे अधिकारी आहोत. तुझ्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. चौकशीसाठी तुला सोबत चलावे लागेल”, असे सांगितले. झलक घाबरली. दोघेही झलकला तिच्याच मोपेडवर घेऊन हिंगण्यातील डिमार्ट मागे भाड्याने घेतलेल्या घरात नेले. ते तिला खोलीत डांबले. झलक घरी परतली नाही म्हणून नातेवाइकांनी शोध घेतला असता ती आढळून आली नाही. तिचा मोबाइलही बंद होता.
    KKR vs SRH IPL 2024 Live Update: आंद्रे रसेलची वादळी फलंदाजी, फक्त २५ चेंडूत केल्या इतक्या धावा, KKRने उभा केला २०८ धावांचा डोंगर

    दुसऱ्या दिवशी दुपारी स्वप्निलने झलकच्या आईच्या मोबाइलवर संपर्क साधला. ”तुमच्या मुलीचे अपहरण झाले आहे. ती सुखरुप परत हवी असल्यास ३० लाख रुपयांची खंडणी द्यावी लागेल. पैसे न दिल्यास तिला ठार मारू”,अशी धमकी दिली. झलकची आई घाबरली. झलकची आई व वडिलांनी थेट प्रतापनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी अपहरणासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. गुन्हेशाखेचे पोलीस उपायुक्त निमित गोयल, परिमंडळ एकचे उपायुक्त अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट एकचे निरीक्षक सुहास चौधरी ,प्रतानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित सावंत यांच्या संयुक्त पथकाने लोकेशनच्या आधारे स्वप्निलच्या घरी छापा टाकला. प्रेमीयुगुलाला अटक करून झलकची सुटका केली आणि तिला पालकांच्या स्वाधीन केले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed