• Fri. Nov 29th, 2024

    पुणेकरांनो आनंदाची बातमी; ‘आता हेल्मेटसक्ती नाही, पण…; पुणे पोलीस आयुक्तांकडून माहिती

    पुणेकरांनो आनंदाची बातमी; ‘आता हेल्मेटसक्ती नाही, पण…; पुणे पोलीस आयुक्तांकडून माहिती

    Pune Nesws : पुणे शहर पोलिसांनी दुचाकीस्वार आणि सहप्रवाशांना हेल्मेट वापरण्याबाबत जनजागृती करण्याचे ठरवले आहे. प्रारंभी कडक कारवाई होत नाही; मात्र, जानेवारी 2024 मध्ये परिस्थितीचा आढावा घेऊन कारवाईबाबत निर्णय घेतला जाईल. अपघातांची समस्या गंभीर असल्याने हेल्मेट वापरण्याचे प्रबोधन महत्त्वाचे आहे.

    महाराष्ट्र टाइम्स

    पुणे : दुचाकीस्वारासह सहप्रवाशानेही हेल्मेटचा वापर करण्याच्या आदेशाच्या अनुषंगाने शहर पोलिसांकडून सुरुवातीला जनजागृती करण्यात येणार आहे. दुचाकीचालविताना संबंधितांनी हेल्मेटचा अधिकाधिक वापर करावा, यासाठी प्रोत्साहन दिले जाणार असून, तूर्तास कारवाईचा बडगा उगारण्यात येणार नाही, असे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी गुरुवारी स्पष्ट केले. ‘परिस्थितीचा आढावा घेऊन नवीन वषांत, जानेवारीमध्ये कारवाईबाबतचा निर्णय घेऊ,’ असेही त्यांनी सांगितले.

    रस्ते दुचाकीस्वार अपघातामध्ये व सहप्रवासी (पीलियन रायडर) यांच्या मृत्यू आणि जखमींचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे विनाहेल्मेट दुचाकीस्वार आणि पाठीमागे बसलेल्या दोघांना हेल्मेट आवश्यक असून, ते नसल्यास कारवाई करण्याचे आदेश राज्याच्या वाहतूक विभागाचे अप्पर पोलिस महासंचालकांनी राज्यातील सर्व पोलिस आयुक्त आणि अधीक्षकांना दिले आहेत. सहप्रवाशांवर ‘स्वतंत्र हेड’ खाली कारवाईसाठी ‘ई चलन’ मशिनमध्ये बदल करण्याची सूचना आदेशात केली होती. त्याचे वृत्त ‘महाराष्ट्र टाइम्स’ ने गुरुवारच्या अंकात प्रसिद्ध केले, पुणेकर सुरुवातीपासूनच हेल्मेटसक्तीच्या विरोधात असून, त्यासाठी नागरी आंदोलनही उभे राहिले होते.

    आता दुचाकीस्वारासह मागे बसलेल्या व्यक्तीला देखील हेल्मेटसक्ती करण्याच्या निर्णयाबाबत नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, जनभावना लक्षात घेऊन तूर्तास दंडात्मक कारवाई न करण्याची भूमिका शहर पोलिसांनी घेतली आहे. दरम्यान, शहरात हेल्मेटसक्ती लागू करू नये, या मागणीसाठी आमदार हेमंत रासने यांनी पोलिस आयुक्तांची गुरुवारी भेट घेतली. शहरातील नागरिकांना या सक्तीला सामोरे जावे लागणार नाही, अशी ग्वाही हेमंत रासने यांनी दिली. वाहतुकीच्या नियमांचे स्वसुरक्षेसाठी पालन करणे गरजेचे आहे. महामार्गावर वाहन चालवताना, सर्वांनी नियम पाळावेत, असे आवाहनही रासने यांनी केले.

    पोलीस जनजागृती करणार

    दुचाकी चालविताना 66 दुच्चाव दुचाकीस्वार आणि सहप्रवासी, या दोघांनीही हेल्मेट वापरण्याबाबत नागरिकांचे प्रबोधन केले जाणार आहे. थेट कारवाईचे पाऊल उचलण्यात येणार नाही. रस्ते अपघातांचे प्रमाण पाहता नागरिकांनी हेल्मेट वापरावे, असा आमचा आग्रह असल्याचं पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितलं.

    हरिश मालुसरे

    लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed