• Fri. Nov 29th, 2024
    EVM मध्ये घोळ? पडताळणीची मागणी, पराभवानंतर संदीप वर्पेंची फेर मतमोजणीची मागणी

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Nov 2024, 10:17 am

    कोपरगाव विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आशुतोष काळे विजयी झाले. त्यांच्या विरोधात मविआचे उमेदवार संदीप वर्पे यांनी निवडणूक लढवली होती. जवळपास सव्वा लाख मतांच्या फरकाने संदीप वर्पे यांचा पराभव झाला. कोपरगावात एका अपक्ष उमेदवाराच्या कुटुंबियांची ७ मतं असताना फक्त ३ मतं मिळाली. अपक्ष उमेदवार चंद्राहास औताडे यांनी संदीप वर्पेंच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. यावर वर्पेंनी ईव्हीएम मशीनवर शंका व्यक्त करत फेर मतमोजणीची मागणी केली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *