• Fri. Nov 29th, 2024

    काँग्रेसची महाराष्ट्रातील दुसरी यादी जाहीर; नव्या चार उमेदवारांची घोषणा; नागपूर, रामटेक, गडचिरोली आणि भंडारा-गोंदियाचा समावेश

    काँग्रेसची महाराष्ट्रातील दुसरी यादी जाहीर; नव्या चार उमेदवारांची घोषणा; नागपूर, रामटेक, गडचिरोली आणि भंडारा-गोंदियाचा समावेश

    मुंबई: लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने राज्यातील दुसरी यादी जाहीर केली आहे. देशपातळीवर काँग्रेसची ही चौथी यादी असून यात एकूण ४५ उमेदवारांचा समावेश आहे. या यादीत महाराष्ट्रातील चार उमेदवारांचा समावेश आहे. काँग्रेसच्या चौथ्या यादीत आसाममधील एक, अंदमान आणि निकोबारमधील एक, छत्तीसगडमधील १, जम्मू-काश्मीरमधील २, मध्य प्रदेशधील १२, महाराष्ट्रातील ४, मणिपूरमधील २, मिझोराममधील १, राजस्थानमधील ३, तामिळनाडूमधील ७, उत्तर प्रदेशमधील ९, उत्तराखंडमधील २ तर पश्चिम बंगालमधील एका उमेदवाराचा समावेश आहे.
    काँग्रेसच्या दुसऱ्या यादीतील उमेदवार

    रामटेकमधून रश्मी बर्वे
    भंडारा-गोंदियामधून प्रशांत पडोळे
    नागपूरमधून विकास ठाकरे
    गडचिरोलीमधून नामदेव किरसान

    याआधी काँग्रेसने राज्यातील पहिली यादी जाहीर केली होती, ज्यामध्ये राज्यातील सात उमेदवारांचा समावेश होता. दुसऱ्या यादीसह काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकूण ११ उमेदवारांची घोषणा झाली आहे. महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गटाने अद्याप एकही उमेदवार जाहीर केलेला नाही.

    काँग्रेसच्या पहिल्या यादीतील उमेदवार

    कोल्हापूर- शाहू महाराज
    पुणे- रविंद्र धंगेकर
    नंदुरबार- गोवाल पाडवी
    सोलापूर- प्रणिती शिंदे
    लातूर- शिवाजी कालगे
    नांदेड- वसंत चव्हाण
    अमरावती- बळवंत वानखेडे

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *