म. टा. प्रतिनिधी, पुणे: बारामती मतदारसंघात अजित पवारांसोबतच्या वादावर तोडगा काढण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिले असून, महायुतीचा धर्म पाळण्यासाठी बारामती लोकसभेत सहकार्याची तयारी हर्षवर्धन पाटील यांनी दर्शविली आहे. त्यामुळे पाटील यांचे बंड थंड होण्याची शक्यता आहे. पुढील काळात अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक होण्याचे संकेत त्यांनी दिले.राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून ‘हर्षवर्धन पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांना तालुक्यात फिरू देणार नाही,’ अशा शब्दांत धमक्या दिल्या गेल्या. त्यामुळे पाटील यांच्यासह कार्यकर्ते चांगलेच संतापले होते. त्यामुळे गेल्या दीड महिन्यापासून हर्षवर्धन पाटील यांनी तालुक्यात अजित पवारांविरोधात वातावरण निर्मिती करण्यास सुरुवात केली. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी पाटील यांना मंगळवारी ‘सागर’ बंगल्यावर चर्चेला बोलाविले होते. त्यानुसार, फडणवीस-पाटील यांची बुधवारी अर्धा तास चर्चा झाली. त्या वेळी पाटील यांची कन्या अंकिता पाटील-ठाकरे उपस्थित होत्या.
राजकारण: यवतमाळ-वाशीममध्ये जोर शिवसेनेचा, पाच टर्मच्या खासदार भावना गवळींना यंदा तिकीट मिळणार?‘उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी पुणे जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा झाली. आमचे काही प्रश्न, कार्यकर्त्यांच्या भावना त्यांच्यासमोर मांडल्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत यापूर्वी चर्चा झाली आहे. स्थानिक स्तरावर काही प्रश्न आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी निवड करण्यासाठी युतीचा धर्म सर्वांनी पाळला पाहिजे. महायुतीच्या सर्वच घटक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचीही जबाबदारी आहे. त्यावर फडणवीस यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली आहे. आमच्या प्रश्नांबाबत फडणवीस आणि अमित शहा यांनी मार्ग काढण्याचे आश्वासन दिले आहे,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.
बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत बैठक, फडणवीसांनी हर्षवर्धन पाटलांची समजूत काढली?
आम्ही मांडलेल्या सर्व समस्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिले आहे. प्रमुख कार्यकर्त्यांची अजित पवार यांच्यासोबत आणखी एक बैठक होणे गरजेचे असून, तशी बैठक लवकरच होईल.
– हर्षवर्धन पाटील