Pune Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच पुण्यातील बाणेर पोलीस स्टेशनमध्ये एक संतापजनक घटना समोर आली आहे.
रात्रीच्या त्या पाच तासात काय घडलं?
दोघे मित्र-मैत्रिण बालेवाडी येथील रेस्टॉरंटमध्ये पार्टीसाठी गेले होते. मद्यपानानंतर कारस्थान रचून त्यांना मारहाण झाली, असं सांगून त्यांनी रेस्टॉरंटमध्ये गोंधळ केला. हॉटेल मॅनेजरकडे सीसीटीव्ही पाहण्यासाठी विचारले असता, ‘फुटेज मुंबईत आहे, उद्या मिळेल,’ असं सांगितलं. यावरून दोघांनी थेट बाणेर पोलीस ठाण्यात जाऊन राग काढला. पोलीस ठाण्यात 3 मार्चच्या रात्री 11.45 वाजता सुरु झालेला गोंधळ 4 मार्चच्या पहाटे 5 वाजेपर्यंत सुरूच होता. बाणेर पोलीस ठाण्यात महिला पोलीस उपनिरीक्षक समोर तरुणीने रागात बोलून पोलीस युनिफॉर्म ओढला आणि हातावर चावा घेतला. युवराजनेही धमकी दिली, ‘मी माझ्या पावरने तुमची नोकरी मिटवतो.’ दोघांनी असंही सांगितले की उद्या ठाण्यात परत येऊन पुन्हा गोंधळ करतील.
Pune News: पुणे-शिरूर, तळेगाव-चाकण-शिक्रापूर; अनेक उन्नत मार्गांचा विस्तार, पुण्यातील रखडलेले प्रकल्प महिनाभरात मार्गी लागणार
तरुणी पुण्यातील विद्यार्थिनी
युवराज निलेश परतानी मूळचा हरियाणाचा असून पुण्यात नोकरी करतो. या दोघांनी मद्यपान करून पोलीस ठाण्यात घातलेल्या गोंधळामुळे पोलीस देखील हैराण झाले होते. पोलिस दोघांचा शोध घेत आहेत आणि पुढील कारवाई लवकरच होणार आहे.
पुण्यात 29 वर्षीय तरूणाला अटक
पुण्यातील हडपसर-सासवड रस्त्यावरील दिवेघाटाच्या पायथ्याशी 3 मार्च रोजी भयंकर घटना घडली. एका महिलेचं अर्धनग्न मृतदेह आढळल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. नेमके प्रकरण काय? महिलेची हत्या करण्यामागचं कारण काय? वाचा सविस्तर
Kandivali Youth Dies : ओमान किनारपट्टीवर ड्रोन हल्ला; मुंबईतील तरुणाचा करुण अंत, तीन महिन्यापूर्वीच आईचं निधन
नेमकं काय घडलं?
दिवेघाटाच्या पायथ्याशी 3 मार्च रोजी एका महिलेचं अर्धनग्न अवस्थेत मृतदेह सापडलं. या घटनेची बातमी कळताच फुरसुंगी पोलीस आणि गुन्हे शाखा लगेच घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी तपासाला सुरुवात करून अवघ्या काही दिवसांतच संपूर्ण घटनेचं गुढ उकललं. तपासात आरोपी प्रकाश बिभीषण माने (वय 29) याने या महिलेची हत्या केल्याचं समोर आलं असून त्याला फुरसुंगी पोलिसांनी सध्या ताब्यात घेतले आहे.
