• Mon. Nov 25th, 2024
    मेट्रोच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण, मटण घेऊन जाताना रोखल्याने कृत्य; ‘या’ वस्तू नेण्यास प्रतिबंध

    म.टा. प्रतिनिधी, नागपूर : मेट्रो स्थानकावर मटण घेऊन आलेल्या एका व्यक्तीला रोखल्याचा राग काढत त्याने मित्रांच्या मदतीने सुरक्षा रक्षकालाच बेदम मारहाण केल्याची घटना घडली. अग्रसेन मेट्रो स्थानकावर घडलेल्या या प्रकाराची तक्रार गणेशपेठ पोलिस स्थानकात करण्यात आली आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत नागपूर मेट्रो रेल कंत्राटी कर्मचारी संघाने पोलिसांसह महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डिकर यांनाही निवेदन पाठविले.मेट्रोने प्रवास करताना काही बाबी प्रतिबंधित करण्यात आल्या आहेत. अशा वस्तू मेट्रोतून कोणी नेत असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येते. १५ मार्च रोजी एक व्यक्ती अग्रसेन मेट्रो स्थानकावर मटण घेऊन आला. सुरक्षा रक्षक जयनारायण कुथे यांनी त्याला हटकले. मेट्रोत असे पदार्थ नेण्यास प्रतिबंध असल्याचे सांगत त्यांनी नियमांची माहिती करून दिली. त्यानंतर त्या प्रवाशाने मित्रांना बोलावून शिविगाळ करायला सुरुवात केली. हा वाद एवढा पेटला की कर्मचाऱ्याला मारहाण करीत ‘मी तुला पाहुण घेईल’ अशी धमकी देण्यात आली. आरोपीला तत्काळ अटक करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागपूर मेट्रो रेल कंत्राटी कर्मचारी संघाने केली.
    मनसे भाजप युती होणार? राज ठाकरे दिल्लीला रवाना, भाजप नेतृत्वाशी चर्चा करणार!

    महामेट्रोच्या ‘एमडीं’ना पत्र

    यापूर्वीही मेट्रो स्थानकावर सुरक्षा रक्षक कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्याच्या घटना घडल्या. यामुळे मेट्रोच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून महामेट्रोने याची दखल घ्यावी, अशी मागणी संघटनेचे अद्यक्ष महेश खांदारे, महामंत्री नितीन कुकडे यांनी केली. कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली नाही तर कंत्राटी कर्मचारी मेट्रोभवनसमोर आंदोलन करतील, असा इशारा कर्मचारी संघटनेकडून देण्यात आला.

    मेट्रोतून या वस्तू नेण्यास प्रतिबंध

    -धोकादायक आणि आक्षेपार्ह साहित्य वाहून नेण्यास मनाई करण्यात आली आहे.
    -स्फोटक पदार्थ ज्यात स्फोट किंवा आग किंवा दोन्हीचा धोका असतो
    -द्रवरूप किंवा विरघळलेले वायू
    -पेट्रोलियम आणि इतर ज्वलनशील पदार्थ
    -विषारी पदार्थ
    -किरणोत्सर्गी पदार्थ
    -शस्त्रे, शस्त्रे आणि दारूगोळा
    -कोणतीही रासायनिक, जैविक, रेडिओलॉजिकल, आण्विक आणि वर्धित पारंपारिक शस्त्रे ज्यात प्रवासी किंवा मालमत्तेला धोका आहे
    -कुजलेले प्राणी, मृतदेह, मृत पक्षी
    -मानवी सांगाडा
    -पोर्टेबल रेडिओ उपकरणे ज्यात रेडिओ कम्युनिकेशन नेटवर्क आणि कम्युनिकेशन आधारित ट्राफिक कंट्रोल सिग्नलिंग नेटवर्कला धोका आहे
    -कोणतीही व्यक्ती मेट्रो रेल्वेवर जिवंत प्राणी किंवा पक्षी घेऊन जाऊ शकत नाही. परंतु कर्तव्यावर असलेला सुरक्षा रक्षक सुरक्षेच्या उद्देशाने स्निफर डॉग सोबत नेऊ शकतो.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed