• Tue. Jun 16th, 2026

    Satara News: ‘फिरायला येणार का? ट्रीपला चल’, शिक्षकाचे विद्यार्थिनीला आक्षेपार्ह मेसेज, उंब्रज पोलिसांकडून गुन्हा दाखल

    Satara News: ‘फिरायला येणार का? ट्रीपला चल’, शिक्षकाचे विद्यार्थिनीला आक्षेपार्ह मेसेज, उंब्रज पोलिसांकडून गुन्हा दाखल

    कराडच्या उंब्रज येथील एका शाळेत शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या नात्याला काळीमा फासणारा प्रकार समोर आला आहे. एका शिक्षकाने विद्यार्थिनीला आक्षेपार्ह मेसेज पाठवल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सुधीर पाटील, सातारा : शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना कराड तालुक्यातील उंब्रजमधील एका महाविद्यालयात घडली आहे. ‘फिरायला येणार का? ‘ट्रीपला चल’, असे अश्लील मेसेज पाठवत विद्यार्थिनीशी गैरवर्तन करणाऱ्या धनाजी तानाजी सावंत (रा. पाप्री, ता. मोहोळ, जि. सोलापूर), या शिक्षकावर उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेने पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

    उंब्रज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थिनी कराड तालुक्यातील उंब्रजमध्ये एका महाविद्यालयात शिकत आहे. त्याच महाविद्यालयातील शिक्षक धनाजी सावंत याने 12 मार्च रोजी विद्यार्थिनीला तिच्या मोबाईलवर फिरायला येणार का? ट्रीपला चल, असे मेसेज पाठवून तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे विद्यार्थिनी गोंधळून गेली. मी तुमची विद्यार्थिनी आहे. असे मेसेज पाठवू नका, असे तिने शिक्षकाला बजावले. तरीही त्याने अश्लील मेसेज पाठवणे सुरूच ठेवत शरीर सुखाची मागणी केली.

    या प्रकारामुळे घाबरलेल्या विद्यार्थिनीने पहिल्यांदा ही बाब तिच्या विश्वासातील एका महिलेला सांगितली आणि नंतर कुटुंबीयांना माहिती दिली. कुटुंबीयांनी उंब्रज पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे विनयभंग केल्याचा गुन्हा नोंदवला. तसेच चोवीस तासात तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले असल्याची माहिती उपनिरीक्षक रमेश ठाणेकर यांनी दिली.

    पतीसमोर पत्नीचा विनयभंग, एकावर गुन्हा दाखल

    दुसरीकडे साताऱ्यातील उपनगरात पतीसमोर पत्नीच्या कमरेला हात लावून विनयभंग केल्याप्रकरणी अर्जुन रामा खवळे याच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. संशयित आरोपी हा पीडित फिर्यादी महिलेच्या जवळ येऊन विचित्रप्रकार करु लागला. तसेच त्याने महिलेच्या कमरेवर हात ठेवून कंबर जोरात दाबली. त्याचा जाब विचारल्याने आरोपी अर्जुन खवळे याने फिर्यादी महिलेच्या पतीस शिवीगाळ करून मारून टाकण्याची धमकी दिली. या प्रकरणी संशयित आरोपी विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा