जयंत पाटील म्हणाले की, “मुळात देशभरात सात टप्प्यात व महाराष्ट्रात ५ टप्प्यात मतदान घेण्याची गरज नाही, चार ते पाच टप्प्यात हे मतदान प्रक्रिया पार पडली असती. विशेषत महाराष्ट्रात ४८ मतदारसंघ त्यासाठी ५ टप्पे मतदानासाठी काहीच गरज नव्हती. यातून कोणाची सोय करायची आहे? असा प्रश्न आम्हाला पडला आहे”
आंबेडकरांबाबतीत आमचा एकच प्लॅन, त्यांनीही एकच प्लॅन ठेवावा
प्रकाश आंबेडकर यांच्या बाबतीत आमचा प्लान बी नाही आहे. महाविकास आघाडीतील सर्वच पक्ष प्रकाश आंबेडकर यांना सोबत घेण्यासाठी सकारात्मक आहे. आमचा प्लान एकच आहे. प्रकाश आंबेडकर यांना देखील विनंती आहे की त्यांनी देखील एकच प्लान आमच्या करिता ठेवावा, असे मिश्किलपणे जयंत पाटील म्हणाले.
जयंत पाटील यावर सविस्तर बोलताना म्हणाले की, महायुतीमधील दोन मित्र पक्ष यांना बाजूला ठेवून भाजपने आधीच जागा वाटप करत यादी जाहीर केली आहे. आम्ही आघाडीचा धर्म पळतो. सर्वांचे वाटप झाल्यावर आम्ही करतो. बाळासाहेब आंबेडकर हे आघाडी सोबत येतील. ते सोबत तोडगा काढतील. संविधान वाचवण्यासाठी सोबत येणं गरजेचं आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.
ज्योती मेटे यांच्याशी चर्चा केली
जयंत पाटील म्हणाले की, बीड लोकसभा मतदारसंघात काय करणं आवश्यक आहे. आज ज्योती मेटे यांच्यासोबत यावर आम्ही सल्लामसलत केलं आहे. अंतिम निर्णय जाहीर करू. सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करत आहोत. मित्रपक्ष बोलत आहेत. त्यामुळे आम्ही थांबलो आहोत असेही जयंत पाटील बोलताना म्हणाले.