Mumbai Stuti Sonwane Case : फजल खानबाबत आणि त्यांच्या दोघांच्या नात्याबद्दल लिहलं आहे, तसेच ती घेत असलेल्या या टोकाच्या निर्णयाबाबत देखील तिने सर्वांची माफी मागितली आहे.
बॉयफ्रेंडला पोलिसांकडून अटक
मुंबईतील अँटॉप हिल पोलीस ठाणे यांनी स्तुती सोनवणे या तरूणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी फजल मोहम्मद खान (वय 31) याला लोअर परळ येथून पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी स्तुतीच्या वडिलांनी दिलेल्या एफआयआर मधून अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. यामध्ये तिच्या वडिलांनी स्तुतीने लिहलेल्या सुसाईड नोटचा देखील उल्लेख केला आहे, यामध्ये तिने फजल खान बाबत आणि त्यांच्या दोघांच्या नात्याबद्दल लिहलं आहे.
Stuti Sonwane : रिलेशनशीप असतानाही फैझुल डेटिंग अॅप वापरायचा, स्तुतीची रडवणारी चिठ्ठी, तीन वर्षांनी तरुण प्रियकरामुळे जीव दिला
स्तुतीने सुसाईड नोटमध्ये काय लिहिलेलं?
प्रिय फुजैल,आपली पहिली भेट दादरला झाली होती, ते मला अजूनही आठवतंय. आपण तासन्तास चाललो होतो आणि पिझ्झा खाताना तू मोठ्याने ओरडत हसत होतास. त्याक्षणी आपली लगेचच छान मैत्री झाली होती. माझा वाढदिवस तू ताज हॉटेलमध्ये ज्या प्रकारे साजरा केला, खोली सजवली होतीस, ते मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. कोणी मला इतकं खास वागवेल असं मी कधी कल्पनाही केली नव्हती.
Pune-Nagar Highway: देशातील सर्वात लांब उड्डाणपूल पुणे-नगर महामार्गावर, पुणे-शिरूर 31 किमी लांब रस्ता; प्रवासात वेळ वाचणार
आपला अलीबागचा ट्रिप, त्या बाइक राईड्स, आंबट कँडी खात घालवलेले क्षण, त्या छोट्या बाथटबमध्ये तू बसण्याचा प्रयत्न करत होतास ते खूप मजेशीर आणि गोड होतं. बॅडमिंटन खेळताना मी तुला नेहमी हरवायचे, तेही मला आठवतं. पण मी आता खूप थकले आहे. मला हे सगळं सहन होत नाही. मला आयुष्यात कधीच इतका अपमान सहन करावा लागला नव्हता. मला हे आयुष्य नको आहे. मला पुन्हा कधी उठायचं नाही. कदाचित मृत्यूनंतरच्या आयुष्यात मला शांती मिळेल. फुजैलसाठी मी माझा अभिमान, स्वाभिमान सगळं सोडलं. तुला अनेकदा माफ केलं. पण आता हे सहन होत नाही. आई, बाबा, माझी बहीण आणि डॉ. बंगा… मला माफ करा. मी खूप कमकुवत आहे. मला हे आयुष्य जगता येत नाही. मी मोठी होऊ शकले नाही, यशस्वी होऊ शकले नाही, पैसे कमवू शकले नाही, याबद्दल मला खूप वाईट वाटतं. मी प्रयत्न केला, पण हे खूप कठीण आहे. हा विचार मला आधीही अनेकदा आला होता. पण यावेळी तो थांबवता आला नाही.
