• Mon. Mar 16th, 2026

    रिलेशनशीप असतानाही फैझुल डेटिंग अ‍ॅप वापरायचा, स्तुतीची रडवणारी चिठ्ठी, तीन वर्षांनी तरुण प्रियकरामुळे जीव दिला

    रिलेशनशीप असतानाही फैझुल डेटिंग अ‍ॅप वापरायचा, स्तुतीची रडवणारी चिठ्ठी, तीन वर्षांनी तरुण प्रियकरामुळे जीव दिला

    Mumbai Crime : फैझुलच्या धूम्रपान आणि मद्यपानाच्या सवयींचा मला त्रास होऊनही प्रेमात असल्यामुळे मी रिलेशनशीप पुढे नेण्याचं ठरवलं, असही स्तुतीने लिहिलं आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : दंतचिकित्सेचे वैद्यकीय शिक्षण घेणारी मुंबईतील २४ वर्षीय विद्यार्थिनी स्तुती सोनवणे हिने आयुष्य संपवल्याची घटना मंगळवारी समोर आली. तिने लिहिलेल्या सहा पानांच्या चिठ्ठीत प्रियकराकडून सतत होणारा अपमान, अनादरपूर्ण वर्तन आणि अपमानास्पद टिप्पणी यांचा आरोप केला आहे. त्यानुसार पोलिसांनी प्रियकर फैजुल मोहम्मद खानला अटक करुन कोठडीत पाठवले आहे.

    आदल्या रात्री काय घडलं?

    अँटॉप हिल येथे आई, वडील आणि बहिणीसह राहणारी स्तुती सोनवणे मास्टर्स इन डेंटल सर्जरी करत होती. सोमवारी संध्याकाळी सात वाजता सोनवणे दाम्पत्य जेवायला बाहेर गेले, तेव्हा स्तुती एकटीच रुममध्ये होती. तुझ्यासाठी काही खायला आणू का, असं आई बाबांनी विचारताच स्तुतीने नकार दिला. रात्री पालक घरी आले, तेव्हा त्यांना स्तुतीच्या खोलीतील दिवा चालू दिसला. ती अभ्यास करत असावी, असा विचार करुन त्यांनी तिला तसदी देणं टाळलं.दुसऱ्या दिवशी, मंगळवारी सकाळी १० वाजून गेले तरी स्तुती आपल्या रुममधून बाहेर न आल्यामुळे आई-वडील गोंधळले. त्यांनी दरवाजा तोडला तेव्हा नायलॉनच्या स्कार्फने गळफास घेतलेल्या अवस्थेत ती खोलीत सापडली.

    २१ वर्षांचा फैझुल मोहम्मद खान हा कायदे विषयातील पदवीधर असून इन्शुरन्स ब्रोकर म्हणून काम करतो. डेटिंग अॅपवर दोघांची भेट झाली होती.
    Maharashtra TimesCrime News : ताई मावशीचा जीव घेतला, हार्ट अटॅकमुळे मृत्यू झाल्याचं भासवलं, बॉयफ्रेण्डची टिप आणि मायलेक अडकले

    स्तुतीच्या शेवटच्या चिठ्ठीत काय काय?

    स्तुतीजवळ आढळलेल्या सहापानी चिठ्ठीत तिने बॉयफ्रेण्ड फैझुलवर अनेक आरोप केले आहेत. आम्ही एक वर्षाहून अधिक काळ एकत्र होतो. आम्ही अनेक आनंदी क्षण एकत्र घालवले. मात्र तो अनेकदा माझा अपमान करायचा. ‘तुझे शब्द खूप शक्तिशाली होते, आयुष्य संपवण्यासाठी ते पुरेसे ठरले. मी सुन्न झालेय. मला आशा आहे, की तू आनंदी असशील. तुझ्या पुरुषी अहंकाराला समाधान मिळालं असेल’ असं तिने चिठ्ठीत लिहिलं आहे.

    Maharashtra Heat Wave Update | महाराष्ट्रात उष्णतेचा कहर ! तापमान ४० पार, कुठे यलो अर्लट?

    ‘आम्ही रिलेशनशीपमध्ये असूनही फैझुल डेटिंग अॅपवर अॅक्टिव्ह असायचा. मला वाटतं मीच वेडी होते. पण माझा नाइलाज होता. आपण सगळ्याच गोष्टींवर नियंत्रण ठेवू शकत नाही’ असंही स्तुतीने चिठ्ठीत लिहिलं आहे.
    Maharashtra TimesNashik Crime : नाशिकच्या तरुणाची बॉडी सापडली, 15 दिवस मारेकऱ्याच्या शोधासाठी मोर्चे, आरोपी निघाले बायको आणि प्रियकर
    फैझुलने माझा वाढदिवस ताज हॉटेलमध्ये साजरा केला होता. त्याच्या धूम्रपान आणि मद्यपानाच्या सवयींचा मला त्रास होऊनही प्रेमात असल्यामुळे मी रिलेशनशीप पुढे नेण्याचं ठरवलं, असही स्तुतीने लिहिलं आहे.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा