• Sat. Sep 19th, 2026
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज  पाहा एका क्लिकवर


Live News in Marathi: इराणने बुधवारी पर्शियाच्या आखातात व्यापारी जहाजांना लक्ष्य केले. तसेच, दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरही हल्ला केला. व्यापारी जहाजांवरील हल्ल्यात दोन भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला असून, आणखी एकजण अद्याप बेपत्ता आहे, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रणधीर जयस्वाल यांनी बुधवारी दिली. दरम्यान, युद्धाचा परिणाम इंधनपुरवठ्यावर होण्यास सुरुवात झाली आहे. याचे पडसाद आता मुंबई शहर व उपनगरांसह नवी मुंबई, पनवेल, कल्याण येथील गॅसपुरवठ्यावर उमटताना दिसत आहेत. एलपीजी सिलिंडरच्या पुरवठ्यांमध्ये अडथळे निर्माण झाल्याने घरगुती स्वयंपाकघरांपासून छोट्या खानावळी, हॉटेल-रेस्टॉरंट यांच्यासह रस्त्यावरील खाद्यपदार्थांच्या स्टॉलवरील शेगड्या थंडावण्याच्या मार्गावर आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *