• Sat. Sep 21st, 2024
घे माय धरणी ठाय अशी इथल्या शेतकऱ्यांची अवस्था – उद्धव ठाकरे

यवतमाळ: एक फुल दोन हाफच राज्य सरकार शेतकऱ्यांना न्याय देऊ शकत नाही. यवतमाळ जिल्ह्यात येऊन मोदींनी आश्वासन दिले त्याचे काय झाले. निवडणुकीच्या तोंडावर मोदी इथे येतात. त्यांच्या हाती नाही तर त्यांचे नशीब तुमच्या हाती आहे. शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करणार होते. इथे शेतकऱ्याच्या आत्महत्या वाढल्या आहेत. शेतमालाला बाजारभाव नाही. एक उद्योग यांनी यवतमाळमध्ये आणला नाही. या गद्दारांना धडा शिकवायचा आहे. त्याकरीता तुमच्या विश्वासावर या लुटारुंच्या विरुद्ध मैदानात उतरलो आहे, असा घणाघात शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केला.
मोठी बातमी : मराठा आरक्षण कायद्याला तातडीची स्थगिती देण्यास मुंबई हायकोर्टाचा नकार
जनसंवाद मेळाव्यात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. यावेळी मंचावर विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे, किशोर तिवारी, संजय देशमुख आदी सह शिवसेना (उबाठा) पदाधिकारी उपस्थित होते. हजारो नागरिकांच्या उपस्थितीत त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर सडकून टीका केली. गांधी लेआउट मैदान येथे हा जनसंवाद मेळावा घेण्यात आला. राळेगाव, पांढरंकवडा, बाभुळगाव येथील पदाधिकाऱ्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. यावेळी अंबादास दानवे यांनी देखील शिंदे सरकार आणि मोदी सरकारवर टीका केली.

मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र, आता माघारी फिरणार नाही; वसंत मोरेंच्या डोळ्यात पाणी, कंठ दाटला

उद्धव ठाकरे म्हणाले की, आता उन तापायला लागलं आहे. आपल्याला गद्दारांना उन्हात आणायचं आहे. इथल्या शेतकऱ्यांची घे माय धरणी ठाय अशी अवस्था झालेली असताना याची यांना पर्वा नाही. मुख्यमंत्री झाल्याबरोबर राज्य शेतकरी आत्महत्यामुक्त करीन म्हणणारे शिंदे एक वर्षात राज्यात ४ हजार ७५६ शेतकरी आत्महत्या झाल्या तरी एक शब्द बोलत नाही. इथले पालकमंत्री स्वतःचा स्वार्थ पाहतात, अशी टीका त्यांनी केली. संजय देशमुख यांनी शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या प्रश्न|वर भाष्य केले. यावेळी राळेगाव विधानसभा मतदार संघातील महिला-पुरुष यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. उन्हाची तीव्रता असतानाही नागरिकांची गर्दी लक्ष वेधून घेत होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed