नाशिक: शहरात दिवसेंदिवस गंभीर गुन्हे घडत असल्यामुळे नाशिककरांमध्ये भीतीचं वातावरण पसरत आहे. शहरात दिवसेंदिवस गंभीर गुन्ह्याची नोंद होत आहे. रविवार १० मार्च रोजी नाशिकच्या पंचवटी रामकुंड परिसरात एकाची डोक्यात दगड घालून हत्या झाल्याची घटना घडल्याने नाशिक शहर पुन्हा एकदा खुनाच्या घटनेने हादरले आहे.
रामकुंड परिसरात गोदा घाट येथील चक्रधर स्वामी मंदिराजवळ दोघांनी केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रामतीर्थ परिसरात फिरस्तींमध्ये झालेल्या किरकोळ भांडणाचं रूपांतर हाणामारीत झाले. दोघांच्या हाणामारीत एकाची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. गोदघाट परिसरात फिरस्त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असून याच परिसरात अवैद्य धंदे देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गोदा घाट परिसरात गुन्हेगारीने उच्चांक गाठला असून किरकोळ भांडणातून एकाची हत्या झाल्याने पुन्हा एकदा गोदा घाट परिसरातील गुन्हेगारी वाढत असल्याचे अधोरेखित झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, गोदा घाट परिसरातील चक्रधर स्वामी मंदिराजवळ किरकोळ भांडणातून एकाची हत्या झाल्याची घटना घडली आहे. डोक्यात दगड घालून ही हत्या केल्याचा प्रथमदर्शनी माहिती समोर येत आहे. घटनास्थळी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी देखील दाखल झाले असून पोलिसांनी केलेल्या तपासात दोघांच्या मारहाणीत एकाची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज देखील पोलिसांच्या तपासात मिळून आले आहे. यामध्ये भांडणाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि दोघांनी एकास बेदम मारहाण करत डोक्यात दगड घालून हत्या केल्याचं निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी मारेकऱ्यांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

गोदा घाट रामकुंड येथे देशभरातून पर्यटक येत असतात या ठिकाणी फिरस्त्यांची संख्या मोठी असून या परिसरात दिवसेंदिवस गंभीर गुन्हे घडत असल्याचे पाहायला मिळते. रामतीर्थ परिसरातील खुनाच्या घटनेमुळे रामकुंड येथे येणाऱ्या पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. वारंवार घडत असलेल्या गुन्हेगारीच्या घटनेमुळे स्थानिक व्यवसायिक आणि नागरिकांनी परिसरात पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी केली आहे. पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र रामकुंड परिसरातील गुन्हेगारी कमी होण्याचे प्रमाण हे वाढतच असल्याने स्थानिकांनी पोलिसांवर नाराजी व्यक्त केली आहे. रामकुंड परिसरातील खुनाच्या घटनेमुळे पोलीस प्रशासन काय ठोस पावलं उचलणार हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे.