• Thu. Nov 28th, 2024

    महायुतीचं जागावाटप कधी ठरणार, अजित पवारांनी सगळं सांगितलं, म्हणाले

    महायुतीचं जागावाटप कधी ठरणार, अजित पवारांनी  सगळं सांगितलं, म्हणाले

    पुणे : महायुतीच्या जागा वाटपासंदर्भात वेगवेगळ्या चर्चा सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांची भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. महायुतीतील जागा वाटप उद्यापर्यंत फायनल होईल, असं अजित पवार म्हणाले. मावळचे आमदार सुनील शेळके यांच्यासंदर्भात देखील त्यांनी भूमिका स्पष्ट केली. शेळके यांनी कुणाला दमदाटी केली नसल्याचं म्हणत शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर अजित पवार यांनी भाष्य केलं.

    जागा वाटपावर अजित पवार काय म्हणाले?

    अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना उद्या राज्यमंत्रिमंडळाची बैठक पार पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, प्रफुल पटेल, सुनील तटकरे यांच्यासोबत दिल्लीला जाणार आहे, असं अजित पवार म्हणाले.
    शिंदेंना जितक्या जागा, तितक्याच राष्ट्रवादीलाही हव्यात, छगन भुजबळांनी जागावाटपात पेच वाढवला
    लोकसभा निवडणुकीसाठी किती जागा मागितल्या हे मी जाहीर करणार नाही, असंही अजित पवार म्हणाले. आम्ही व्यवस्थितपणे जागा मागितल्या आहेत. पत्रकारांनी विचारलं जेवढ्या होत्या तितक्या मिळणार का असं विचारलं असता त्यांनी मिश्कील उत्तर दिलं.
    Read Latest Maharashtra News And Marathi News

    अजित पवार म्हणाले की अरे तु आम्हाला वेडा बिडा समजतो का काय रे, असं अजित पवार म्हणाले. तिघांचा सन्मान राहील, सन्मानजनक जागा वाटप होईल, असं ते म्हणाले.

    बारामतीची विरोधकांची उमेदवारी जाहीर झाली आहे त्याबद्दल विचारलं असता त्यांचं स्वागत आहे,असं अजित पवार म्हणाले. महायुतीचं महाराष्ट्रातील ४८ जागांचं वाटप झालं की आम्ही आमचे उमेदवार जाहीर करु, असं अजित पवार म्हणाले.
    Mahayuti : महायुतीचा संभाव्य फॉर्म्युला समोर, लोकसभा निवडणुकीत शिंदे पवारांना किती जागा मिळणार, भाजपला किती?
    शिरुर मधून उमेदवार मिळत नाही का असं विचारलं असता तुम्हाला कळेल, असं अजित पवार म्हणाले. जागा वाटपाबाबत काहीचं ठरलेलं नाही हवेतल्या चर्चा सुरु आहेत, असं अजित पवार यांनी म्हटलं.
    आमची कोणतीही वेगळी भूमिका नाही; जागावाटप कुठपर्यंत? तटकरेंनी सगळंच सांगितलं!

    दिल्लीत महायुतीची पुन्हा बैठक

    महायुतीच्या जागा वाटपासंदर्भात मुंबई आणि दिल्लीत अमित शाह यांच्या उपस्थितीत दोन बैठका पार पडल्या आहेत. अमित शाह यांच्या उपस्थितीत मुंबईतील बैठकीत तोडगा न निघाल्यानं दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत एक बैठक पार पडली होती. आता उद्या पुन्हा एकदा दिल्लीत बैठक होणार आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed