Middle East War Gas Cylinder Effect : गेल्या दोन दिवसांत दैनिक उत्पादन ११ हजार मेट्रिक टनांपर्यंत वाढवण्यात आल्यामुळे राज्यात घरगुती एलपीजीचा कोणताही तुटवडा नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
कोणताही तुटवडा नाही
राज्यात घरगुती वापराच्या सिलिंडरचा तुटवडा नसून, दररोज सरासरी सुमारे नऊ हजार टन एलपीजीची मागणी असते. ही मागणी पूर्ण करण्यासाठी रिफायनरीमधील एलपीजी उत्पादन वाढवण्यात आले असून, गेल्या दोन दिवसांत दैनिक उत्पादन ११ हजार मेट्रिक टनांपर्यंत वाढवण्यात आले आहे. त्यामुळे राज्यात घरगुती एलपीजीचा कोणताही तुटवडा नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
विशेष समित्या स्थापन
घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण होऊ नयेत आणि संभाव्य टंचाईच्या परिस्थितीत समन्वय साधता यावा, यासाठी राज्य शासनाने जिल्हास्तरावर विशेष समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण राज्यामध्ये एलपीजी सुरळीत ठेवण्याविषयी; तसेच पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्याच्या अनुषंगाने आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर यांनी दिले आहेत.
Jay Pawar : पिंकी माळींच्या कुटुंबाला भेटायला जय पवार आले, बिल्डिंगची लिफ्ट डगमगली, 18 मजले पायी उतरण्याची सावधगिरी
अधिक घरगुती गॅस सिलिंडर उपलब्ध
मार्च महिन्यामध्ये गेल्या सहा महिन्यांच्या तुलनेत अधिक प्रमाणात घरगुती गॅस सिलिंडर उपलब्ध असून सिलिंडर पुरवठा सुरळीत राहील याची खबरदारी घेण्याच्या सूचना विभागामार्फत सर्व संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या आहेत. जिल्हास्तरावर विशेष समित्या स्थापन घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण होऊ नयेत आणि संभाव्य टंचाईच्या परिस्थितीत समन्वय साधता यावा, यासाठी राज्य सरकारने जिल्हास्तरावर विशेष समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
Pune News : मांजराने पोपटाचा पिंजरा पाडला, पुण्यातील दोन शेजाऱ्यांचा वाद हाणामारीपर्यंत, मांजर मालकावर गुन्हा
या संदर्भात पर्यायी इंधनाच्या वापराची शक्यता तपासण्याचे निर्देशही यंत्रणांना देण्यात आले आहेत. यामध्ये कोळसा, रॉकेल आदी पर्यायांचा विचार केला जाणार असला, तरी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक राहणार आहे.
LPG gas shortage news | अफवांवर विश्वास ठेवू नका; गॅस सिलेंडरचा मुबलक साठा, नागपूरकरांना दिलासा
