• Fri. Mar 20th, 2026

    मविआच्या जागावाटपापूर्वी काँग्रेसची महत्त्वाची बैठक, १९ जागांचा आढावा घेणार, किती लढणार?

    मविआच्या जागावाटपापूर्वी काँग्रेसची महत्त्वाची बैठक, १९ जागांचा आढावा घेणार, किती लढणार?

    मुंबई : महाविकास आघाडीच्या लोकसभेच्या जागावाटपाची बैठक उद्या पार पडणार आहे. या बैठकीपूर्वी काँग्रेसनं आज महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत महाराष्ट्रातील १९ जागांबाबत आढावा घेतला जाणार आहे. मुंबईतील ६ जागांबाबत आढावा घेण्यासाठी स्वतंत्र बैठक होणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे काँग्रेस नेत्यांना आणि संभाव्य उमेदवारांना मार्गदर्शन करतील, अशी माहिती आहे.महाराष्ट्र काँग्रेसच्या आजच्या बैठकीला २०२४ चे संभाव्य उमेदवार, २०१९ ची लोकसभा निवडणूक लढवणारे उमेदवार आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि फ्रंटल सेलचे अध्यक्ष उपस्थित आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यानं आगामी लोकसभा निवडणुकीत १९ जागांवर निवडणूक लढवू असा विश्वास व्यक्त केला आहे.
    Sanjay Raut: जे तुरुंगात हवेत, ते निवडणूक रिंगणात; हीच का मोदी गॅरंटी? संजय राऊतांचा सवाल
    महाविकास आघाडीची जागा वाटपाची बैठक उद्या पार पडणार आहे. या बैठकीला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी सहभागी होतील.
    एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा लोकसभेच्या १८ जागांवर दावा,भाजपचा तो फॉर्म्युला फेटाळला, महायुतीत जागावाटपाचा तिढा
    नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांच्याकडून गडचिरोली, चिमूर, भंडारा-गोंदिया, चंद्रपूर , यवतमाळ, हिंगोली, नांदेड, रामटेक, नागपूर, अमरावती, अकोला, लातूर, जालना, धुळे, नंदुरबार, कोल्हापूर, सांगली, पुणे आणि भिवंडी या जागांचा काँग्रेसकडून आढावा घेतला जाईल.
    Read Latest Maharashtra News And Marathi News

    राज्यसभा खासदार, विधानसभेचे आमदार, विधानपरिषदेचे आमदार,माजी खासदार उपस्थित राहीतल, अशी माहिती नाना पटोलेंननी दिली. लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. जागा वाटपाचा फॉर्म्युला लवकरच अंतिम होईल, असंही ते म्हणाले.
    वंचितसह महाविकास आघाडीचं जागावाटप झालं, जरांगेंना उमेदवारी द्यायला ते राजकीय नेता नाही : संजय राऊत
    महाविकास आघाडीची जागा वाटपाची बैठक उद्या पार पडणार आहे. नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, उद्धव ठाकरे, जयंत पाटील हे शरद पवार यांच्याशी भेटून वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या प्रस्तावाबाबत चर्चा करतील. आमची बैठक झाली हे प्रश्न सुटतील, असं काँग्रेस नेत्यानं म्हटलं. शिवसेना ठाकरे गट २०, काँग्रेस १८ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट १० जागांवर निवडणूक लढवतील अशी चर्चा आहे. यापैकी २ जागा वंचितला तर राष्ट्रवादीच्या वाट्याला येणारी हातकणंगलेची जागा राजू शेट्टींना दिली जाईल, अशी चर्चा आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed