• Sun. Sep 13th, 2026

Akola Crime News: अकोला जिल्ह्यातील जांबवसू गावात जागेच्या वादातून धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. वृत्तसेवा, अकोला: पूर्ववैमनस्यातून बोलेरो वाहन थेट घरावर चढवून सरपंचाच्या ७० वर्षीय आईला चिरडल्याची घटना बार्शीटाकळी तालुक्यातील जांबवसू येथे घडली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या मनाबाई मकरम जाधव यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

जांबवसू येथे जमिनीच्या वादातून दोन गटांमध्ये मागील अनेक वर्षांपासून वैमनस्य आहे. पोळ्याच्या दिवशीही या दोन गटांत किरकोळ वाद झाला. दोन्ही गट आमनेसामने आल्याने बार्शीटाकळी पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली. याच वादाचा राग मनात धरून एका बोलेरोचालकाने वाहन थेट मनाबाई यांच्या घरावर चढवून पाडले. त्यानंतरही चालकाने वाहन मागे-पुढे करत घराचे मोठे नुकसान केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

या दरम्यान अंगावर भिंत कोसळून तसेच वाहनाखाली चिरडून मनाबाई गंभीर जखमी झाल्या. उपचारासाठी नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. घटना घडत असताना गावकऱ्यांनी वाहनचालकाला थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकाने बेदरकारपणे वाहन चालविल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अखेर काही ग्रामस्थांनी दगड-विटांचा मारा करून वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला.

Maharashtra TimesAhilyanagar Crime : दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठलं, अहिल्यानगरमध्ये तानाजी बोराडेंना संपवलं; घटनेचं कारण अस्पष्टतीन संशयित ताब्यात

पोलिसांनी या प्रकरणात तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. नेमका कशावरून हा वाद एवढा चिघळला याचा तपास पोलिस करीत आहेत. गावात तणावपूर्ण वातावरण कायम असल्याची माहिती आहे.

Maharashtra TimesBuldhana Crime: स्मशानभूमीचा वाद पेटला; बुलढाण्यातील शेवग्यात तुफान हाणामारी, पाच जण गंभीर जखमी, 40वर गुन्हेबेलतरोडीत प्रॉपर्टीच्या वादातून दोघांवर गोळीबार

प्रॉपर्टीच्या खरेदी-विक्रीच्या पैशांवरून सुरू असलेल्या वादाला गुरुवारी मध्यरात्री हिंसक वळण लागले. बेलतरोडीतील गोटाळ-पांजरी परिसरात दोन गटांमध्ये वाद झाला. या वादातून दोघांवर गोळीबार करण्यात आला. यात कार्तिक पुरुषोत्तम धार्मिक आणि शैलेश हिरामण गुल्हाणे जखमी झाले असून, त्यांच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणात बेलतरोडी पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकाने सर्व सात आरोपींना अटक केली.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा