• Sat. Sep 21st, 2024
रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी; आता हिंगोलीहून मुंबईसाठी धावणार ‘जनशताब्दी’, कधी होणार सुरु?

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : जालना-मुंबई जनशताब्दी रेल्वे हिंगोलीहून सोडण्याची हिंगोलीवासीयांची अनेक दिवसांपासूनची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. येत्या सात मार्चपासून जनशताब्दी एक्सप्रेस हिंगोली ते मुंबई अशी धावणार आहे. या रेल्वेला मान्यवरांच्या उपस्थितीत हिरवा कंदील दाखविण्यात येईल, अशी माहिती नांदेड रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे.

जालना ते मुंबई या दरम्यान धावणाऱ्या जनशताब्दी एक्सप्रेस या रेल्वेचा मार्गविस्तार करण्याची अनेक दिवसांपासून मागणी होती. हिंगोलीसह परभणी येथील रेल्वे संघटनांसह हिंगोलीवासीयांनीही आंदोलन केले होते. ही मागणी अनेक दिवसांपासून प्रलंबित होती. याशिवाय हिंगोलीवासीयांचा पाठपुरावा या भागातील लोकप्रतिनिधींकडूनही करण्यात येत होता. जालना ते मुंबई दरम्यान वंदे भारत रेल्वे सुरू झाल्यानंतर जनशताब्दी एक्सप्रेस हिंगोलीपर्यंत नेण्याची मागणी अधिक तीव्र करण्यात आली होती.
पाच हजारांची लाच पडली महागात, लाचखोर दुय्यम निबंधकाच्या घरी सापडली १ कोटी ३५ लाख रुपयांची रोख रक्कम
अखेर रेल्वे विभागाने जालना ते मुंबई या मार्गावर धावणारी जनशताब्दी एक्सप्रेस ही रेल्वे सात मार्चपासून हिंगोली ते मुंबई अशी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते हिंगोलीत रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला जाईल. या वेळी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटीलही उपस्थित राहतील, अशी माहित माहिती रेल्वेतर्फे देण्यात आली आहे.

दुसरा मार्गविस्तार

जनशताब्दी एक्सप्रेस सुरुवातीला मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते छत्रपती संभाजीनगर अशी धावायची. तिला प्रवाशांचा चांगला प्रतिसादही होता. यानंतर या रेल्वेचा विस्तार हा जालन्यापर्यंत करण्यात आला. आता दुसऱ्यांदा मार्गविस्तार हिंगोलीपर्यंत करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed