• Sat. Sep 21st, 2024
अजितदादांनी मांडलेला अर्थसंकल्प कसा वाटला? सुनेत्रा पवार म्हणाल्या….

बारामती: उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाचे कौतुक त्यांच्या पत्नी व बारामती लोकसभा मतदारसंघाच्या संभाव्य उमेदवार सुनेत्रा पवार यांनी केले.

राज्यातील महिला व मुलींसाठी अर्थसंकल्पात ३ हजार १६० कोटी रुपयांची भरघोस तरतूद केली. याचा मला आनंद आणि अभिमान आहे, असे म्हणत या अर्थसंकल्पातून मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण, अभियानाअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात महिलांना थेट लाभ मिळणार आहे, असे सुनेत्रा पवार म्हणाल्या.

राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनिसांची रिक्त पदे भरण्याची कार्यवाही सुरू केली आहे. कुपोषणाच्या समस्यावर मात करण्यासाठी नागरी बालविकास केंद्रही सुरू करण्यात आलं आहे. त्यामुळे केवळ बारामतीतच नव्हे तर संपूर्ण राज्यातील नारी शक्तीचा आवाज बुलंद होणार आहे. जिल्हा नियोजन समितीतून महिला व बाल विकास विभागासाठी तीन टक्के निधी राखीव ठेवण्याचा निर्णय केला आहे, असे म्हणत त्यांनी अर्थसंकल्पाचे कौतुक केले.
सुनेत्रा वहिनीच बारामती लोकसभेच्या उमेदवार, भाजप नेते संजय काकडेंनी ‘ओपन सिक्रेट’ फोडलंच

खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार अद्याप निश्चित झाला नसला तरी सुनेत्रा पवार याच संभाव्य उमेदवार असल्याचे निश्चित मानले जात आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांच्या बरोबरच सुनेत्रा पवार यांनीही बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा सुरू केला आहे. याचाच भाग म्हणून बारामती, इंदापूर, दौंडसह आदी भागात मोठ्या प्रमाणात त्यांचे दौरे वाढले असून दोघींकडूनही विविध विकासकामांचे भूमिपूजने व उद्घाटने पार पडत आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूक ही चुरशीची होणार असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

फुलांची उधळण, ढोल आणि बॅनर… सुनेत्रा पवारांचं बारामतीत क्रेन द्वारे भल्या मोठ्या हाराने स्वागत!

तब्बल ‘सव्वाशे’ किलोचा भला मोठा हार घालून सुनेत्रा पवार यांचे स्वागत

मागील काही दिवसांपासून सुनेत्रा पवार यांचे बारामती मतदारसंघात प्रचंड दौरे वाढल्याचे दिसून येत आहे. सुनेत्रा पवार यांच्या हस्ते बारामतीतील विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन होत आहे. आज त्यांच्या उपस्थितीत बिरजू मांढरे मित्र परिवाराच्या वतीने सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत महिलांसाठी होम मिनिस्टर व हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी सुनेत्रा पवार यांचे तब्बल १२५ किलोचा भला मोठा हार क्रेनच्या साहाय्याने घालून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed