पुणे : लोकसभा निवडणुक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वच प्रमुख राजकीय पक्षासोबत वंचित बहुजन आघाडीने देखील लोकसभा निवडणुकीसाठी तयारी केली आहे. महाराष्ट्रभर वंचित बहुजन आघाडीतर्फे सत्ता परिवर्तन महासभेचे आयोजन करण्यात येत आहे. याच अंतर्गत आज पुण्यामध्ये प्रकाश आंबेडकर यांची सभा होत आहे.वंचित बहुजन आघाडीच्या सत्ता परिवर्तन महासभेला प्रकाश आंबेडकर संबोधित करणार आहेत. पुण्यात होणाऱ्या या सभेमध्ये प्रकाश आंबेडकर यांचे ‘पुण्याचे भावी खासदार’ म्हणून बॅनर लावण्यात आले आहेत. त्यामुळे अकोला, सोलापूरनंतर आता प्रकाश आंबेडकर यांना नव्या लोकसभा मतदारसंघाचे वेध लागल्याचे बोलले जात आहे. एकीकडे प्रकाश आंबेडकर यांचा महाविकास आघाडीला साथ द्यायची की एकला चलो रे चा नारा द्यायचा याचा निर्णय झाला नाहीये. अशातच आता प्रकाश आंबेडकर यांचे पुण्यातील सभेत भावी खासदार म्हणून बॅनर लागल्याने नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
आधीच सोलापूर आणि अकोला लोकसभा मतदारसंघातून प्रकाश आंबेडकर यांचे नाव चर्चेत आहे. यातच आता महाविकास आघाडीतील तीन पक्षांचे जागा वाटप ठरल्यानंतर आणि कोणता पक्ष कोणकोणत्या जागा लढविणार हे कळल्यानंतर आम्ही आमच्या जागांसंदर्भात वैयक्तिकरित्या तीन पक्षांसोबत वाटाघाटी करुन जागांची मागणी करणार असल्याचे आंबेडकर यांनी स्पष्ट केले. त्यामुळे प्रकाश आंबेडकर नक्की काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.

एकीकडे पुण्यामध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस अशी सरळ लढत होण्याचं चित्र आहे. पर्यायाने महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी लढाई होत असताना पुण्यातल्या या लोकसभेच्या रणसंग्रामात वंचित बहुजन आघाडीने देखील उडी घेतली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या आधी पुण्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट आल्याचं पाहायला मिळत आहे.