Nashik Honey Trap: जर पैसे दिले नाहीत, तर हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करेन. तुझी बदनामी करेन आणि तुला संपवून टाकेन, अशी धमकी व्यावसायिकाला दिली.
पोलिसांनी माहितीनुसार, दिलेल्या संशयिताने व्यावसायिक फिर्यादीसोबत व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून ‘सानवी खुराणा’ या नावाने संपर्क साधत मैत्री व प्रेमाचे आमिष दाखविले. त्यानंतर एका बनावट क्रिप्टो ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर खाते उघडण्यास भाग पाडले. क्रिप्टो करन्सी ट्रेडिंगमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून संशयिताने फिर्यादीला विविध यूपीआय आयडी आणि बँक खात्यांवर वेळोवेळी पैसे भरण्यास प्रवृत्त केले. या गुंतवणुकीवर आभासी पद्धतीने कोट्यवधींचा नफा भासविण्यात आला. मात्र, नफा व मूळ रक्कम काढण्यासाठी ‘कमिशन’च्या नावाखाली फिर्यादीकडून तब्बल ५२ लाख ९३ हजार २२८ रुपये उकळण्यात आले. या प्रकरणी नाशिक शहर सायबर पोलिसांत संबंधित बँक खाते क्रमांक व व्हॉट्सअॅप, फेसबुक प्रोफाइलविरुद्ध गुन्हा नोंद आहे. वरिष्ठ निरीक्षक संजय पिसे तपास करीत आहेत.
Nashik Crime : डॉक्टर महिलेशी संबंध, डॉ. मनीषा जेजुरकरांचा मानसोपचार तज्ञ नवऱ्यानेच जीव घेतला, बहिणीचे गंभीर आरोप; पोस्टमार्टम रिपोर्टवर संशय
नफ्याचे ‘मायाजाल’
फिर्यादीने सुरुवातीला काही पैसे गुंतविले, तेव्हा त्याला स्क्रीनवर काही कोटी रुपयांचा नफा दिसत होता. हा आकडा पाहून तो अधिकच भुलला. संशयिताने कधी ‘ट्रेडिंग कमिशन’, तर कधी ‘टॅक्स’च्या नावाखाली फिर्यादीकडून तब्बल ५३ लाखांची रक्कम उकळली. ही रक्कम भरण्यासाठी त्याने फायनान्स आणि बँकेच्या विविध खात्यांचा वापर केला. दरम्यान, तानिया शर्मा नावाच्या संशयित तरुणीने एका व्यावसायिकास ४८ लाख ५५ हजारांचा गंडा घातल्याचे काही दिवसांपूर्वीच उघड झाले होते.
Nashik Crime : इन्स्टावर ओळख, नाशकातील नववीच्या विद्यार्थिनीवर नदीकाठी दोघांचा अत्याचार, मोबाईलमध्ये व्हिडिओ काढले
प्रेमाचा शेवट ‘ब्लॅकमेलिंग’ने!
जेव्हा फिर्यादीने मूळ रक्कम आणि नफा परत मागितला, तेव्हा संशयित ‘सानवी’चे रूप बदलले. संशयिताने पुन्हा ३४ लाख रुपयांची मागणी केली. पैसे देण्यास नकार देताच दोघांमध्ये संमतीने शेअर झालेले नग्न फोटो आणि खासगी व्हिडीओ संशयिताने फिर्यादीलाच पाठविले.
