prakash ambedkar slams pm modi govt over gas shortage iran israel war impact on india esma
‘आत्मनिर्भरते’वर टीका
अनेक वर्षांपासून ‘आत्मनिर्भरते’चा जप करणाऱ्या सरकारने प्रत्यक्षात नैसर्गिक वायू साठवणूक आणि पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला. अमेरिका आणि इराणमधील तणाव वाढणार हे स्पष्ट असतानाही भारताने अल्जीरिया, ऑस्ट्रेलिया किंवा नॉर्वे यांसारख्या पर्यायी देशांकडून गॅस आयातीचे नियोजन का केले नाही? असा प्रश्न त्यांनी या पोस्टमध्ये उपस्थित केला आहे. केवळ युद्धाची ठिणगी पडल्यावरच सरकारला जाग आली, ही देशाच्या ऊर्जा सुरक्षेची मोठी हार असल्याचे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.
मध्यमवर्गीय आणि गरिबांना फटका
दरम्यान, प्रकाश आंबेडकरांच्या मते, या इंधन टंचाईचा सर्वाधिक फटका सामान्य जनतेला बसणार आहे. गॅस पुरवठ्यावर निर्बंध आल्यामुळे छोटे-मोठे ढाबे, रेस्टॉरंट आणि संपूर्ण हॉस्पिटॅलिटी सेक्टर अडचणीत आले आहे. “पंतप्रधान मोदी आणि हरदीपसिंग पुरी यांनी या व्यावसायिकांच्या रोजगारावर आणि पर्यायाने पोटावर लात मारली आहे,” अशी टीका त्यांनी केली आहे. केवळ हॉटेलच नव्हे, तर लग्नसराईतील केटरिंग सेवा, एलपीजीवर चालणाऱ्या रिक्षा-टॅक्सी आणि खत निर्मिती उद्योगालाही याचा फटका बसणार आहे. खत टंचाईमुळे शेतीचे उत्पादन घटून भविष्यात अन्नधान्य महाग होण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.
Iran US Israel war: अमेरिकेविरुद्ध युद्धात इराणचा पहिला विजय! दक्षिण कोरियातून ‘थाड’ काढण्याची वेळ; देशात संताप
सीएनजीवर अवलंबित्व धोक्याचे
सरकार सध्या सीएनजीला प्राधान्य देत असले तरी, हा संघर्ष लांबल्यास सीएनजीवर अवलंबून असलेले भारतातले उद्योग कोलमडून पडतील, असा इशाराही त्यांनी दिला. “स्वतःची प्रतिमा जपण्यासाठी धावपळ करणाऱ्या मोदींनी भारताच्या मध्यमवर्गीय आणि गरीब जनतेला मात्र वाऱ्यावर सोडले आहे,” अशा शब्दांत प्रकाश आंबेडकरांनी त्यांचा संताप व्यक्त केला.
Nashik Honey Trap: सोशल मीडियावरचं ‘प्रेम’ 53 लाखांना; व्यावसायिकासोबत मोठा हनी ट्रॅप, घटनेनं पोलिसही चक्रावले
दरम्यान, ऊर्जा सुरक्षेसाठी दीर्घकालीन आणि ठोस धोरणाची आवश्यकता असल्याचेही यावेळी प्रकाश आंबेडकरांनी अधोरेखित केले आहे. या संकटामुळे येत्या काळात महागाईचा मोठा भडका उडण्याची शक्यता असून, विरोधकांनी आता या मुद्द्यावरून सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे.
