• Sat. Sep 21st, 2024
छत्रपती संभाजीनगर पाणी योजनेचे काम २८ किलोमीटरपर्यंत, जॅकवेलचे खोदकामदेखील संपले

छत्रपती संभाजीनगर : शहरासाठीच्या नवीन पाणी पुरवठा योजनेच्या मुख्य जलवाहिनीचे काम २८ किलोमीटरपर्यंत झाले आहे. जायकवाडी धरणातील जॅकवेलचे खोदकाम देखील पूर्ण झाले असून, त्याचे आरसीसी काम सुरू केले जाणार आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम केले जात आहे. या पाणी पुरवठा योजनेसाठी जायकवाडी ते नक्षत्रवाडी दरम्यान सुमारे ३९ किलोमीटर अंतराची २५०० मिलीमीटर व्यासाची मुख्य जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. प्राधिकरणाचे मुख्य अभियंता आर. एस. लोलापोड यांनी माहिती देताना सांगितले की, ३९ किलोमीटरपैकी मुख्य जलवाहिनी टाकण्याचे २८ किलोमीटरपर्यंत काम पूर्ण झाले आहे. ३८ किलोमीटरचे पाइप प्राप्त झाले असून उर्वरित एक किलोमीटरचे पाइप येण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे मुख्य जलवाहिनी टाकण्याचे काम विनाअडथळा पूर्ण होईल.
पिंपरीत पाणी योजनांच्या कामांना वेग; २३८ कोटी रुपयांचा खर्च, केंद्राकडून ४२ कोटींचा निधी
जायकवाडी धरणात जॅकवेलचे खोदकाम सुरू होते, हे काम आता पूर्ण झाले आहे. जॅकवेलच्या आरसीसीचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. जुलै महिन्यापर्यंत जमीन पातळीपेक्षा जास्त काम करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. जलशुद्धीकरण केंद्र, एमबीआरपासून जलकुंभांपर्यंत टाकण्यात येत असलेल्या लिडिंगमेन लाइनचे कामदेखील प्रगतिपथावर आहे. जायकवाडी धरणात अॅप्रोच ब्रिजचे काम ५० टक्के झाले असल्याची माहिती त्यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed