• Sat. Sep 21st, 2024
कर्तव्यावर असताना हृदयविकाराचा झटका, वाशिमच्या जवानाला साश्रू नयनांनी अखेरचा निरोप

वाशिम: रिसोड तालुक्यातील वाडी वाकद येथील गरीब कुटुंबातील निखिल घुगे २०११ मध्ये सैनिक सेवेत रुजू झाला. मात्र ऐन उमेदीच्या काळात केवळ ३२ व्या वर्षी कर्तव्यावर असताना हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला. त्याचे पार्थिव आज २६ फेब्रुवारी रोजी त्यांच्या मूळ गावी दाखल होताच त्याची पत्नी, आई-वडील आणि ग्रामस्थांनी हंबरडा फोडला. वीर सैनिक निखिलच्या तीन वर्षाच्या मुलाला पाहून सगळ्यांचेच मन हेलावले.
कट्टर विरोधक श्रीकांत शिंदे आणि राजू पाटील एकाच व्यासपीठावर, मनसे-शिंदेसेनेचं मनोमिलन झालं?
मिळालेल्या माहितीनुसार, रिसोड तालुक्यातील वाडीवाकद गावचे सुपुत्र निखिल मोतीराम घुगे (३२) यांना आज २६ फेब्रुवारी रोजी अंतिम निरोप देण्यात आला. निखिल घुगे हे राजस्थानमधील जोधपूर येथे कर्तव्यावर होते. २४ फेब्रुवारी रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. हे वृत्त जिल्ह्यात पसरताच सर्वत्र शोककळा पसरली असून आज २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता त्यांचे पार्थिव रिसोड तालुक्यातील वाकद येथील शिवाजी विद्यालयात आणण्यात आले. यावेळी मोठी गर्दी जमली होती. त्यांच्या मूळ गावी वाडीवाकद येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.या अंत्यसंस्कारात रिसोड पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. शूर सैनिक निखिल यांना शेकडो नागरिकांनी साश्रू नयनाने अखेरचा निरोप दिला. निखिल घुगे २०११ मध्ये सैन्यात दाखल झाले होते. त्यांचे लष्करी प्रशिक्षण नाशिकमध्ये पूर्ण झाले. तेथून त्यांची पोस्टिंग बिकानेरमध्ये झाली. त्यानंतर त्यांची पोस्टिंग नालंदा, जम्मू-काश्मीरमध्ये झाली. त्यानंतर निखिल यांचे प्रमोशन होऊन राजस्थानमधील जोधपूर येथे बदली झाली. निखिल हे अत्यंत गरीब कुटुंबातील असून त्याचे आई-वडील त्यांच्या अडीच एकर जमिनीवर शेती करून उदरनिर्वाह करतात.

अजित पवारांना थांबवलं, वडेट्टीवार आशा सेविका आणि अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नावरून आक्रमक

निखिल गावात खूप लोकप्रिय होते. ते नेहमी गावातील तरुणांना सैनिक सेवेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन, मार्गदर्शनही करीत होते. निखिल यांची पत्नी वाडीवाकद गावच्या सरपंच आहेत. आपल्या मेहनतीमुळे आणि समर्पणामुळे निखिलने सैन्यात भरती होण्यापर्यंत मजल मारली होती. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. वयाच्या ३२ व्या वर्षी त्यांचे आकस्मिक निधन ही गावकऱ्यांसाठी अत्यंत दु:खद घटना मानली जात आहे. निखिलच्या अंत्ययात्रेत ग्रामस्थांसह रिसोडचे आमदार अमित झनक, माजी सैनिक, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed