आमदार गणपत गायकवाड न्यायालयीन कोठडीत
गोळीबार प्रकरणात आमदार गणपत गायकवाड सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. गणपत गायकवाड यांच्यासह १५ जणांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली असून सध्या सर्व आरोपी तळोजा कारागृहात आहेत. सत्ताधारी आमदारानेच पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याने एकच खळबळ उडाली होती. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच खासदार श्रीकांत शिंदे यांनी महेश गायकवाड यांची रुग्णालयात जात विचारपूस केली होती
महेश गायकवाड यांच्या स्वागतासाठी समर्थकांची बॅनरबाजी
गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळाबारात गंभीर जखमी झालेल्या महेश गायकवाड यांच्यावर मागील अनेक दिवसांपासून उपचार सुरू होते. आमदार गणपत गायकवाड यांनी तब्बल सहा गोळ्या महेश गायकवाड यांच्यावर झाडल्या होत्या. ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये महेश गायकवाड यांच्यावर उपचार चालू होते. यादरम्यान भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये सोशल मिडिया वॉर रंगले होते. दोन्ही नेत्यांच्या समर्थकांकडून स्टेटस ठेवत एकमेकांना डिवचण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. मात्र, महेश गायकवाड यांना डिस्चार्ज मिळाल्याने कार्यकर्त्यांनी शहरभर बॅनर लावले असून स्वागताची जोरदार तयारी केली आहे
