• Sun. Sep 13th, 2026

Amit Shah : 2029 आधी समान नागरी कायद्याची अंमलबजावणी करु, अमित शाह यांची घोषणा

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मोठी घोषणा केली. भाजप आणि एनडीएशासित 21 राज्यांमध्ये 2029 आधी समान नागरी कायदा लागू करु, अशी घोषणा अमित शाह यांनी केली आहे.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सेवा संकल्प अभियान राबवणार असल्याची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने देशात सेवा संकल्प अभियान राबवले जाणार आहे. या योजनेच्या माध्यमातून विविध विकासकामे केली जाणार आहेत. तसेच सरकारने केलेल्या विविध विकासकामांची माहिती या अभियानातून दिली जाणार आहे. एनडीए सरकारने केलेल्या विविध विकासकामे आणि घेतलेल्या निर्णयांची माहिती देत असताना अमित शाह यांनी मोठी घोषणा केली. 2029 आधी देशातील एनडीशासित 21 राज्यांमध्ये समान नागरी कायदा लागू करु, अशी घोषणा अमित शाह यांनी केली.

अमित शाह नेमकं काय म्हणाले?

“राष्ट्रीय सुरक्षेत कलम 370 आणि कलम 35 (अ) हटवण असंभव मानलं जात होतं. रक्ताचा एक थेंब न सांडता, एकही गोळी न चालवता, कलम 370 आज भूतकाळ म्हणून उभे आहे. काश्मीर पूर्णपणे भारतासोबत जोडलेला आहे. तीन तलाक कायदा करुन मुस्लीम महिलांना समान अधिकार दिला. अनेक राज्यांत आम्ही समान नागरी कायदा इन्ट्रोड्यूस केला आहे. मला विश्वास आहे की, भाजप-एनडीए शासित 21 राज्यांमध्ये आम्ही 2029 सालाआधी समान नागरी कायद्याची अंमलबजावणी करु”, अशी घोषणा अमित शाह यांनी केली.

Maharashtra TimesManoj Jarange : माझ्या जवळच्या लोकांच्या चौकशी लावता; ईडीच्या कार्यालयाला घेराव घालणार, मनोज जरांगे पाटील यांचा इशारा“भारताने पाच दशकांपासूनच्या नक्षलवादाला समाप्त केलं आहे. उत्तर पूर्वेत 14 पेक्षा जास्त शांती करार झाले आहेत आणि 9 हजार पेक्षा जास्त लोकांना सरेंडर करुन आज उत्तर-पूर्वेला विकासाच्या रस्त्यावर घेऊन गेलो आहोत. सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक आणि ऑपरेशन सिंदूरने दहशतवादाप्रती शुन्य सहिष्णूताची स्थिती स्थापित केली आहे आणि अनेक क्षेत्रांना सुरक्षेला प्राधान्य देण्याचं काम झालं आहे”, असं अमित शाह म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शासनाचे प्रमुख म्हणून 25 वर्षे कारकीर्द पूर्ण केली आहे. राज्याच्या आणि देशाच्या प्रमुख पदावर सलग 25 वर्षे राहण्याचा रेकॉर्ड त्यांनी केला आहे. गेली 12 वर्षे भारताचे पंतप्रधान म्हणून ज्या प्रकारची प्रगती त्यांनी केली आहे ती आपण जवळून पाहिली आहे. म्हणूनच ही 25 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एक निर्णय सर्वांनी मिळून घेतला आहे. मोदींच्या प्रमुख पदांवरील 25 वर्षे झाल्याच्या प्रत्यर्थ सेवा संकल्प अभियान चालवायचा”, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Maharashtra TimesAmruta Fadnavis : माझे भाऊ सणाचे दिवस लक्षात घेऊन जे काही करतील, ते शांततेनेच करतील, अमृता फडणवीस यांचं वक्तव्य“मोदींच्या एकूण कारकीर्दीत सेवाभाव हा त्यांच्या राजकारणाचा स्थायी भाव राहिलेला आहे. राजकारणापेक्षा सेवाकारण आणि गरीब कल्याण अजेंडा त्यांनी सातत्याने चालवला आहे. त्यामुळे हे निमित्त साधून सरकार आणि पक्ष जनतेमध्ये जावून सेवेची कामे करतील, अशाप्रकारची संकल्पना तयार करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनानेदेखील सेवा संकल्प अभियानाच्या निमित्ताने जे वेगवेगळे कार्यक्रम घेतलेले आहेत त्याचा एकत्रित शासन निर्णय काढलेला आहे. हा प्रत्येक कार्यक्रम सामान्यातील सामान्य माणासाच्या जीवनात परिवर्तन घडवून आणणारा आहे. त्यासोबत समाजात मोदींच्याप्रती आत्मीयता प्रकट करण्याचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे”, अशी देखील माहिती फडणवीसांनी दिली.