• Thu. Sep 17th, 2026

Manoj Jarange : माझ्या जवळच्या लोकांच्या चौकशी लावता; ईडीच्या कार्यालयाला घेराव घालणार, मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मदत करणाऱ्या श्रीमंत मराठ्यांच्या चौकशी केली जात असल्याचा आरोप जरांगे यांनी केला आहे. यावरुन मनोज जरांगे पाटील यांनी ईडी कार्यालयाला घेराव घालण्याचा इशारा दिला आहे.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
जालना : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत सविस्तर भूमिका मांडली. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला मदत करणाऱ्या मराठा उद्योजकांची चौकशी केली जात असल्याची माहिती जरांगे यांनी दिली. यावरुन जरांगे यांनी सरकारला इशारा दिला. “श्रीमंत लोक आंदोलनात मदत करतात म्हणून सरकार त्यांना अडकवत आहे. सरकार त्यांना अडचणीत आणणार आहे का? सगळ्या समाजात श्रीमंत लोक असतात. ते समाज अडचणीत आल्यानंतर मदत करतात. त्यात चुकीचं काय? निवडणूकीत तुम्ही कॉन्ट्रॅक्टरकडून मदत घेत नाही का? मग पैसे वाटण्यासाठी कुठून आणता?”, असे सवाल मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी केले.

“आम्हाला निरोप आला मंत्र्यांसोबत चांगले संबंध ठेवा. नाही ठेवत आम्ही चांगले संबंध. शिवसेना सोडून तुम्हाला गद्दारीचे डाग लागल्यानंतर हे डाग पुसण्यासाठी मराठे लागतात. निवडून यायला मनोज जरांगे आणि मराठा समाज लागतो. आता आम्ही बोललेली भाषा शिवराळ वाटते का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत चांगले संबंध नसले तरी आमचं काहीही होऊ शकत नाही”, असं जरांगे यांनी ठणकावून सांगितलं.

ईडी कार्यालयाला घेराव घालण्याचा इशारा

“आंदोलन करायला मदतीचा हात घ्यावाच लागतो. मराठे मदत करणाऱ्यांच्या बाजूने उभे राहायला हवेत. आंदोलन चालवण्यासाठी मराठ्यांची मदत घेतली नाही तर आंदोलन चालवायचं कसं? माझ्या जवळच्या लोकांची चौकशी लावता. मग तुम्हाला मदत करणाऱ्यांची चौकशी कशी होत नाही ते मी बघतो, ईडीच्या कार्यालयाला घेराव घालतो”, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

Maharashtra TimesAmruta Fadnavis : माझे भाऊ सणाचे दिवस लक्षात घेऊन जे काही करतील, ते शांततेनेच करतील, अमृता फडणवीस यांचं वक्तव्य“मला गुंतवा आणि जवळचे गुंतवा. मी माझ्या जवळच्या लोकांना सांगितलं आहे की, तुम्ही माझ्यासोबत राहा अथवा राहू नका. मी माझं आंदोलन सुरू ठेवणार, मी मंत्र्यांना चांगलं बोलणार नाही. माझी जात महत्वाची आहे. MPSC चा प्रश्न निकाली काढा. माफी मागतो. शिवराळ भाषेतील सगळे शब्द मागे घेतो. सोडवा सगळे प्रश्न”, असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं.

मुंबईच्या दिशेला कधी निघणार?

“आम्ही 15 सप्टेंबरला मुंबईकडे सकाळी 11 वाजता निघणार आहोत. सरकारला मते लागतात. पण प्रश्न सोडवायचे नाहीत. आमचे लोकशाही मार्गाने मुंबईत आंदोलन होईल. 19 सप्टेंबरला मुंबईत उपोषण सुरू होईल. अनेक भागात आज पाऊस झाला आहे. शेतकरी सुखावला आहे. त्यामुळे आंदोलनात ऊर्जा मिळेल. पावसामुळे चैतन्य मिळालं आहे. शेतीकामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे मुंबईत या आंदोलनात जास्त लोक येतील”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Maharashtra TimesNagpur News : हायकोर्टाचे विश्वास नांगरे पाटील यांना महत्त्वाचे निर्देश, डीजे प्रकरणावर कोर्टात काय-काय युक्तिवाद?

मंत्री उदय सामंत यांच्या वक्तव्यावर जरांगे काय म्हणाले?

“मंत्री उदय सामंत काय म्हणाले ते मला माहीत नाही. गेल्यावर्षी पण गणेशोत्सव होता. तुम्ही वर्षभर काय केलं? आमदार प्रसाद लाड या लढ्यात आल्यापासून देखील आम्ही सरकारला वेळ दिला. आजपासून पुन्हा 8 दिवस सरकारकडे वेळ आहे. संधी देऊनही तुम्ही चूक करता. तुम्हाला 3 वर्ष संधी दिली. मग मुंबईत येऊ नका असं तुम्ही कसं म्हणून शकता? सरकारची प्रवृत्ती नीच आहे. तुम्ही माझ्या सहकाऱ्यांना जाणूनबुजून त्रास देणार, शनिवारी-रविवारी चौकशी लावता? एवढे ॲक्टीव तुम्ही कधीपासून झालात? मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आता बाईच्या पदराआड जाऊन काम करू लागला आहे”, असा घणाघात जरांगे यांनी केला.

जरांगे यांचा मंत्री बावनकुळे यांचा एकेरी उल्लेख करत निशाणा

“तुमच्याकडून आमचं काहीही वाकडं होत नाही. तुला आम्ही आमदार प्रसाद लाड यांच्यामुळे सुट्टी दिली. तुम्ही आमच्या सगळ्या संपत्त्या घ्या. आंदोलन काळातच चौकशा का? बावनकुळे तू सावध राहा. छगन्या सांगतो ना, बाई नाराज झाली. बाईच्या माध्यमातून दिसतं ना. माझ्या जवळच्या लोकांना त्रास दिला. हे महाराष्ट बघतोय ना”, असा घणाघात मनोज जरांगे यांनी केला.

“कोणती शिवराळ भाषा? नाकर्तेपणा सांगा तुमचा. ईडी चौकशी लावता आणि तुमच्या पक्षात घेता. ही तुमची नामर्दगी. शिवराळ भाषा म्हणजे काय? 3 वर्ष उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना चांगला बोललो, त्याचं काय? आता वाईट वाटतं. मला मराठ्यांची गरज आहे. मी नेत्यांकडून बोलत नाही. तुम्ही अन्याय करूनही अन्याय केला नाही म्हणायचा का? आमच्या मराठ्यांवर शिंदेंच्या मंत्र्याने अन्याय केला आहे. तुम्हाला पद घ्यायचे असतील म्हणून तुम्ही चांगले म्हणता”, असं जरांगे म्हणाले.