या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार हे आज कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. त्यांनी शाहू महाराजांची भेट घेतली असून दोघांमध्ये एक तास चर्चा झाली, या भेटीकडे राजकीय वर्तुळातील अनेकांचे लक्ष लागून राहिले होते. शाहू महाराजांना उमेदवारी देण्यासंदर्भात माझ्या एकट्याचा निर्णय असू शकत नाही यामध्ये काँग्रेस व शिवसेना ठाकरे गट यांचे भूमिका ही महत्त्वाचे आहे. मात्र शाहू महाराजांना उमेदवारी दिली तर त्याचा मला आनंद असेल, असेही शरद पवार यावेळी म्हणाले आहेत त्याच भेटीनंतर माध्यमांशी बोलत होते.
तर त्याचा मला आनंदच
खासदार शरद पवार हे दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर आले असून त्यांनी आज आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांची भेट घेतली. दोघांमध्ये एक तास विविध विषयांवर चर्चा झाली असून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात महाविकास आघाडीकडून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी देण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यासंदर्भात खासदार शरद पवार यांना विचारले असता त्यांनी यावर स्पष्टपणे बोलणे टाळले. यासंदर्भात निर्णय घ्यायचा अधिकार मला एकट्याला नाही. आमची आघाडी असून त्यामध्ये काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट आहे. जागा वाटपाचा निर्णय हा आम्ही तिन्ही पक्ष एकत्र मिळून होतो. अद्याप शाहू महाराज यांना उमेदवारी देण्यासंदर्भात कोणतेही चर्चा झालेली नाही. मात्र सर्व सहकाऱ्यांच्या नुसार जर शाहू महाराजांना उमेदवारी दिली तर त्याचा मला आनंदच असेल, असे पवार म्हणाले.
शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांशी सुसंगत
शाहू महाराज यांचा राजकारण नाहीतर सामाजिक कार्यात मोठा सहभाग आहे. माझी व त्यांची भेटण्याची वेळ ठरली होती, मात्र त्यांच्याकडून भेटीला विलंब झाला कारण ते दलित मित्र व्यंकाप्पा भोसले यांच्या कार्यक्रमाला गेले होते. म्हणजे त्यांनी आज आमच्यापेक्षा वंचित घटकातील लोकांसाठी काम करणाऱ्यांना अधिक प्राधान्य दिले. ते आज ही राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे विचार पुढे घेऊन जात आहेत. ते शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांशी सुसंगत आहेत, यामुळे श्रीमंत शाहू महाराजांच्या उमेदवारी बाबत कोल्हापूरकरांची इच्छा असेल तर मला व्यक्तिगत आनंद होईल, असेही शरद पवार म्हणाले.
इथून पुढे देशातील सर्व जागा आम्ही जिंकणार असे भाजप सांगावे
लोकसभेसाठी राज्यात एकूण ४८ जागा आहेत यातील ३९ जागांवर महाविकास आघाडीचे एकमत झाले आहे. उरलेल्या चार-पाच जागा संदर्भात त्या संदर्भात अद्याप एकमत होऊ शकलेले नाही. या संदर्भात उद्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये या जागे संदर्भातील तिढा सुटेल असे सांगितले असून या सोबतच त्यांनी भाजपचे देखील कान टोचले आहेत. भाजपने देशातील ५४२ जागांपैकी ४०० जागा जिंकणार व महाराष्ट्रातील ४८ जागांपैकी ४० जागा जिंकणार असे सांगत आहेत म्हणजे ते कमीच सांगत आहेत. त्यामुळे त्यांनी इथून पुढे देशातील सर्व जागा आम्ही जिंकणार, असं सांगायला हवा चला असे म्हणत भाजपची खिल्ली उडवली आहे.