• Mon. Nov 25th, 2024
    नाशिकनंतर पुण्याचा नंबर, कुरकुंभ MIDC मध्ये ११०० कोटींचं ड्रग्स जप्त

    पुणे : पुणे पोलिसांनी अंमली पदार्थ निर्मिती करण्याविरोधात दोन दिवसात दोन मोठ्या कारवाया केल्या आहेत. आधी मिठांच्या पुड्यांमध्ये एमडी विक्री करणाऱ्या डिलरला अटक करण्यात आली होती. तर आज सकाळी कुरकुंभ औद्योगिक वसाहतीत एका औषध निर्माण कंपनीत तब्बल ११०० कोटी रुपयांचे ६०० किलोपेक्षा जास्त एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. या घटनेनं पुण्यात मोठी खळबळ उडाली आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी याबाबत माहिती आज दिली आहे.ड्रग्स तस्कर विरोधात पुणे पोलिसांनी फास आवळला आहे. ड्रग्स तस्कर ललित पाटीलनंतर पुण्यात ही मोठी कारवाई झाली आहे. दौंड कुरकुंभ औद्योगिक वसाहतीत औषध निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या आड एमडी ड्रग्स बनवण्याचा प्रकार सुरू होता. याची माहिती पुणे पोलिसांना मिळताच कारवाई केली आहे. या प्रकरणी अनिल साभळे नावाच्या व्यक्तीलाही अटक करण्यात आली आहे.
    Chandigarh Mayor:’आप’चे कुलदीप कुमार चंडीगडचे नवे महापौर; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, निवडणूक अधिकाऱ्यावर खटला
    पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, काल सोमवारी पुणे पोलिसांनी पुण्यातल्या विश्रांतवाडी येथून १०० कोटींपेक्षा अधिक एमडी ड्रग्स ताब्यात घेतले होते. या प्रकरणी तिघांना पोलिसांनी अटक केली होती. वैभव ऊर्फ पिंट्या भारत माने (रा. पुणे), अजय अमरनाथ करोसिया (वय ३५, रा. पुणे) आणि हैदर शेख (रा. विश्रांतवाडी), असं ड्रग्स विक्री करणाऱ्या आरोपींची नाव होती. हे मिठांच्या पुड्यांमध्ये भरून ड्रग्स विक्री करत होते. त्यांची कसून तपासणी केली असताना दौंड येथील फॅक्टरीची माहिती मिळाली.

    आयुक्तांच्या सूचनेनुसार आज सकाळी दौंड येथे संबंधित कारखान्यावर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने धाड टाकली आणि कारखाना चालवणाऱ्या अनिल साबळे याला अटक केली. ६०० किलो एमडी ड्रग्स ताब्यात घेण्यात आलं आहे. ललित पाटीलप्रमाणे ही मोठी कारवाई मानली जात आहे. मात्र, आता याचे धागेदोरे कोणाकडे जातात आणि कोण यामध्ये मुख्य सुत्रदार आहे? याबाबत पोलीस तपास करत आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *