• Sat. Sep 21st, 2024

‘वादा तोच पण दादा नवा’, वळसे पाटलांच्या मतदारसंघात रोहित पवारांच्या नावाने बॅनरबाजी, चर्चांना उधाण

‘वादा तोच पण दादा नवा’, वळसे पाटलांच्या मतदारसंघात रोहित पवारांच्या नावाने बॅनरबाजी, चर्चांना उधाण

पुणे : काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्यासोबत जात महायुतीत सहभागी झाले. त्यावेळी अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक दिग्गज नेते देखील गेले. त्यात शरद पवार यांचे अत्यंत जवळचे मानले जाणारे दिलीप वळसे पाटील यांनी देखील अजित पवारांना साथ देत शरद पवारांची साथ सोडली मात्र, आता दिलीप वळसे पाटील यांचा बालेकिल्ला असणाऱ्या आंबेगाव मतदार संघात शरद पवार यांची उद्या सभा होणार आहे. मात्र त्या अगोदर लावलेल्या बॅनरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. रोहित पवार यांच्या लागलेल्या बॅनरने सर्वांचे लक्ष वेधले आहे.”वादा तोच..! पण दादा नवा! या आशयाचे बॅनरने लक्ष वेधून घेतले आहे.पुणे – नाशिक महामार्गावर असणाऱ्या मंचर शहराजवळ हे बॅनर झळकले आहेत. त्यामुळे अजित पवारांची जागा रोहित पवार आता घेणार का अशी चर्चा देखील सुरू झाली आहे. मात्र या बॅनरमुळे दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघाची मात्र चांगलीच चर्चा होऊ लागली आहे.

एक मराठा लाख मराठा, काँग्रेस आमदार धीरज देशमुख यांचं लक्षवेधी जॅकेट, विधिमंडळात चर्चेचा विषय
पुणे जिल्ह्याचे शिरूरचे आमदार वगळता जवळपास सर्वच आमदार अजित पवार यांच्यासोबत आहेत. पुणे जिल्हा हा अजित पवारांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्यामुळे अजित पवार हे त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांसाठी आधीपासूनच दादा आहेत. मात्र रोहित पवारांच्या या बॅनरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

दादा भावनिक आवाहन करतील असं वाटलं नव्हतं, रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा

या बॅनर्सवर “वादा तोच..! पण दादा नवा”, अशी टँगलाईन असलेलं बॅनर झळकल्याने अजित पवारांना डिवचण्याचा प्रयत्न रोहित पवार समर्थकांकडून केला जात आहे. मात्र उद्या होणारी सभा ही सर्वांसाठीच चर्चेचा विषय असणार आहे. शरद पवार उद्या नेमके काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण दिलीप वळसे पाटील हे शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू म्हणून मानले जायचे. मात्र, त्यांनी शरद पवारांची साथ सोडल्याने शरद पवार त्यांच्याबद्दल काय बोलणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed