• Sat. Sep 21st, 2024
लोकसभेला इच्छुक नाही, राणेंनी चर्चा धुडकावल्या; पण रत्नागिरी सिंधुदुर्गवर भाजपचा पर्मनंट दावा

रत्नागिरी : कोकणात रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरुन सध्या चर्चा सुरु आहेत. या मतदारसंघात भाजपकडून ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे नावही पुढे आले आहे. या विषयावर बोलताना नारायण राणे यांनी रत्नागिरीत उद्योग विभागाच्या कार्यक्रमासाठी आले आपले स्पष्ट मत व्यक्त केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक नाही, निवडणुकी अगोदर यावर बोलणं उचित नाही, पक्षाचे वरिष्ठ नेते यावर योग्य तो निर्णय घेतील, अशी भूमिका नारायण राणे यांनी घेतली. उद्योगातून रोजगार निर्मितीसाठी येथे रिफायनरी प्रकल्प आपण आणणार असल्याचाही पुनरुच्चार नारायण राणे यांनी केला आहे.

आगामी लोकसभा निवडणुकांसाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे नाव चर्चेत आहे. त्याबाबत बोलताना नारायण राणे यांनी सांगितले, की मी इच्छुक नाही, पक्षाचे वरिष्ठ नेते योग्य निर्णय यासंदर्भात घेतील. परंतु जबाबदारी दिली तर ती स्वीकारला मी तयार आहे. तसेच या लोकसभा मतदारसंघात कोणीही उमेदवार उभा असला तरी त्याला भाजपच्याच कमळावर निवडणूक लढवावी लागणार असल्याचेही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सांगितले.

कोकणात राजापूर रिफायनरी होणार आहे, याबाबत माझं पेट्रोलियम मंत्र्यांशी बोलणं सुरु आहे, अशी नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पेट्रोलियम मंत्री संबंधित कंपन्यांशी संवाद साधत आहेत. रिफायनरी रत्नागिरीत व्हावी, इथे रोजगार निर्माण व्हावा, छोट्या मोठ्या कंपन्या स्थापन व्हाव्यात, स्थानिक लोकांमधून उद्योजक निर्माण व्हावेत असंही नारायण राणे म्हणाले.

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघावर भाजपाचा पर्मनंट दावा, उमेदवारीबाबत वरिष्ठ निर्णय घेणार | नारायण राणे

Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

रिफायनरी आणि एमएसएमई हे एकत्र आल्यास रत्नागिरीचा बॅकलॉग भरण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे या ठिकाणी नको ते उद्योग करणार्‍यांना चंद्रावर पाठवल्यास परिस्थिती सुधारेल अशा भावना माजी खा. निलेश राणे यांनी व्यक्त केल्या. रत्नागिरीतील ८० टक्के नागरिक रिफायनरीच्या बाजूने आहेत तर २० टक्के नागरिक हे विरोधात आहेत. रिफायनरीसाठी बारसू येथे ९० टक्के जमीन एमआयडीसीने घेतली असून, प्रकल्प आल्यास मोठे शहर या ठिकाणी उभे राहिल असे निलेश राणे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed